शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली : नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबूझमाड जंगलात पोलिसांनी नक्षल कॅम्प केला उद्धवस्त; शस्त्र, घोडे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 22:54 IST

नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणा-या गडचिरोली व नारायणपूर (छत्तीसगड) जिल्ह्याच्या सीमेवर अबूझमाड जंगलातील नक्षलवाद्यांचा कॅम्प गडचिरोली पोलिसांनी अभियान राबवून शनिवारी दुपारच्या सुमारास उद्ध्वस्त केला.

गडचिरोली, दि. 13 - नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणा-या गडचिरोली व नारायणपूर (छत्तीसगड) जिल्ह्याच्या सीमेवर अबूझमाड जंगलातील नक्षलवाद्यांचा कॅम्प गडचिरोली पोलिसांनी अभियान राबवून शनिवारी दुपारच्या सुमारास उद्ध्वस्त केला. गडचिरोली व नारायणपूर (छत्तिसगड) जिल्ह्यांच्या सीमेवर अबुझमाड भागात नक्षलवाद्यांचा कॅम्प असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस दलाला मिळाली होती. पोलिसांनी येथून तीन भरमार रायफली, सहा घोडे व दैनंदिन वापराचे व नक्षल साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले. विशेष म्हणजे, प्रथमच चकमकीदरम्यान नक्षल्यांचे घोडे जप्त करण्यात आले आहे.

छत्तीसगड जिल्ह्याच्या सीमेवर अबूझमाड भागात नक्षल कॅम्प असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात गडचिरोलीचे विशेष अभियान पथक अबूझमाड भागातील तुंडेवारा व पोकनार गावाजवळील जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित होते. दरम्यान शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ नक्षल्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या चकमकीत पोलीस नक्षलवाद्यांवर वरचढ होत असल्याचे पाहून आपले साहित्य तिथेच टाकून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेत सदर नक्षल कॅम्प उद्ध्वस्त केल्यामुळे नक्षल चळवळीस मोठा हादरा बसला आहे.

वरिष्ठ नक्षलवादी नेते हे ब-याचदा अबूझमाड जंगल परिसरात घोड्यांचा वापर करीत होते. हे स्पष्ट होत आहे. सदर भागात भूपतीसारख्या वरिष्ठ नक्षलवाद्याचा वावर असल्याची शक्यता पोलीस विभागाने वर्तविली आहे. गेल्या महिनाभरात पोलीस जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नक्षलवादी हल्ल्याचा बिमोड करीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.