शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील किल्ले संवर्धनासाठी सरसावले गडप्रेमी

By admin | Updated: March 13, 2016 03:42 IST

इ.स. ६०० ते ७०० मधील इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील किल्ले रतनगड, सोनगिरी, महलमिऱ्या, माणिकगड, सागरगड या गडांचे जतन व संरक्षणासाठी तसेच

जयंत धुळप,  अलिबागइ.स. ६०० ते ७०० मधील इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील किल्ले रतनगड, सोनगिरी, महलमिऱ्या, माणिकगड, सागरगड या गडांचे जतन व संरक्षणासाठी तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांना पर्यटन केंद्रे म्हणून विकसित करण्यासाठी ७० ते ८० गावांतील तरुण सरसावले आहेत. याशिवाय ग्रामस्थानां उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना पेण तालुक्यात गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशन, कोकण या संस्थेच्या तब्बल १०० तरुणांनी गेल्या वर्षीपासून हाती घेतली आहे.संस्थेच्या स्थापनेपासूनच पुरातन वस्तू, वास्तू, किल्ले, गड याच्या देखभालीसाठी स्थानिकांना सहकार्य करण्याचे काम सुरू होते. पेण तालुक्याचा सखोल अभ्यास गेली सात-आठ वर्षे करून विविध माध्यमांतून अधिकृत माहिती व ऐतिहासिक पुराव्यांचे सकलन करण्याचे काम केले. त्याच वेळी गडभ्रमंतीच्या निमित्ताने गडकोट स्वच्छतेचे काम निसर्गच्या शिलेदारांनी केले. त्यातूनच त्यांच्या संवर्धनाची आणि स्थानिकांच्या रोजगारनिर्मितीची संकल्पना पुढे आल्याचे निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशन, कोकण संस्थेचे अध्यक्ष योगेश शशिकांत म्हात्रे यांनी सांगीतले.सन ६00 सालापासूनचे व काही त्यापूर्वीचे ठळक पुरातन अवशेष, वास्तू, वस्तू व ठिकाणे दिसून येत आहेत. त्याचे महत्त्व लक्षात घेऊ नच रीतसर काम करण्यासाठी शासन व स्थानिक ग्रामपंचायतींच्या परवानगीची व्यवस्था होऊन, या अवशेषांचे तत्काळ पंचनामे करून ते शासनाच्या किंवा संस्थेच्या ताब्यात ठेवणे गरजेचे असल्याचे म्हात्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांच्या लक्षात आणून दिले. गडकिल्ले भेटीत स्वच्छता मोहीम तसेच सर्वेक्षणानिमित्ताने मिळणाऱ्या वस्तू, मूर्ती, ठिकाणे यांचे जतन कायमस्वरूपी करावे लागणार असल्याने त्याकरिता दत्तक योजनेचा प्रस्ताव संस्थेचा आहे. त्यास रायगड जिल्हा परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.