शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओला-उबेरचे भवितव्य ‘आॅनलाईन’ ठरवणार

By admin | Updated: August 27, 2016 04:44 IST

सध्या सुरु असलेल्या ओला-उबेर विरुद्ध काळी-पिवळी टॅक्सी यांच्यामधील वाद सोडवण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत आॅनलाईन सर्व्हे करणार आहे.

मुंबई : सध्या सुरु असलेल्या ओला-उबेर विरुद्ध काळी-पिवळी टॅक्सी यांच्यामधील वाद सोडवण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत आॅनलाईन सर्व्हे करणार आहे. त्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत खास प्रश्नावली करणार असून यात प्रवाशांची सुरक्षितता ते प्रवासातील समाधान या सर्व प्रश्नांची उत्तरे आॅनलाईन जाणून घेण्यात येणार आहे.एका क्लिकवर प्रवाशांना आरामदायक प्रवाससेवा पुरवणारी ओला-उबेरला प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली. ओला-उबेरचालक कधीही भाडे नाकारत नसल्याने सामान्य प्रवासी काळ््या-पिवळ््या टॅक्सीपेक्षा ओला-उबेरकडे मोठ्या संख्येने वळत आहे. ओला-उबेरच्या तुलनेत काळी-पिवळी टॅक्सी किती सुरक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी ग्राहक पंचायत आॅनलाईन सर्व्हे करणार आहे. ओला-उबेर विरुद्ध काळी-पिवळी टॅक्सी यांच्या वादात सर्वसामान्य प्रवासी वेठीस धरले जात आहे. यामुळे ग्राहक पंचायतीने या वादावर ‘आॅनलाईन’ तोडगा काढला आहे. या नुसार मुंबई ग्राहक पंचायत डॉट ओआरजी (६६६. े४ेुं्रॅ१ंँं‘स्रंल्लूँं८ं३.ङ्म१ॅ) या संकेत स्थळावर प्रवाशांना आपले मत नोंदवती येणे शक्य आहे. या प्रश्नावलीत प्रवासीहिताची उत्तरे देता येतील. (प्रतिनिधी)निकाल ही आॅनलाईन मुंबईकरांना ओला-उबेर विरुद्ध काळी-पिवळी टॅक्सी यांच्या वादाचा फटका बसू नये, यासाठी आॅनलाईन सर्व्हे घेतला जाणार आहे. हा सर्व्हे ३१ आॅगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. २ सप्टेंबर रोजी या सर्व्हेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुळात प्रवाशांना प्रवास करण्यासाठी सोयीचे वाहन नक्की कोणते याचा वेध घेण्यासाठी ग्राहक पंचायतीने हा सर्व्हे घेण्याचे ठरवले असल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली.