शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

भावी खासदारांनी निवडला आजचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:30 IST

नेते, कार्यकर्त्यांची लगबग सुरू; अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक

मुंबई : आधीच मुहूर्ताचा तुटवडा, त्यात सुट्टीमुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडव्यासारखा महत्त्वाचा मुहूर्त हुकला. त्यामुळे मुंबईतील बहुतांश उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी सोमवारचा दिवस नक्की केला आहे. वाजतगाजत आणि जोरदार शक्तिप्रदर्शन अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे.

राज्यातील १७ जागांसह मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या जागांसाठी २ एप्रिल रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भाजपचे गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन वगळता, अन्य कोणत्याच उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलेला नाही. अपक्षांच्या अर्जांचा आकडाही अगदीच नगण्य होता. अर्ज भरण्यासाठी आता सोमवार आणि मंगळवार असे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. शेवटच्या दिवशी आयत्यावेळचा गोंधळ टाळण्यासाठी युती आणि आघाडीच्या उर्वरित उमेदवारांनी सोमवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे.कार्यकर्त्यांना पोहोचले नेत्यांचे ‘निरोप’दक्षिण मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्यचे उमेदवार राहुल शेवाळे आज मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करतील. सावंत फोर्ट येथील फायर ब्रिगेडपासून मिरवणुकीने अर्ज सादर करण्यासाठी निघणार आहेत, तर राहुल शेवाळे सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करून अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत. दक्षिण मध्यमधील कार्यकर्त्यांना सकाळी जीपीओजवळ जमण्याचे निरोप देण्यात आले आहेत. त्या ठिकाणापासून शेवाळे पदयात्रेने जिल्हाधिकारी कार्यालयात जातील.च्उत्तर पूर्वेचे भाजप उमेदवार मनोज कोटक शक्तिप्रदर्शन करत, आज मुलुंड येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करतील, तर उत्तर पश्चिमेत शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर मंगळवारी अर्ज भरतील.विरोधकही शक्तिप्रदर्शनाच्या तयारीतउत्तर पूर्वचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील वगळता, काँग्रेसचे पाचही उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करतील. दिना पाटील यांनी मंगळवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मिलिंद देवरा आणि एकनाथ गायकवाड मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात आज अर्ज भरणार आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले जाणार आहेत. उर्मिला मातोंडकर, संजय निरुपम आणि प्रिया दत्तसुद्धा शक्तिप्रदर्शनाद्वारे वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत.