शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

मुलाच्या वाढदिवशीच शहीदावर होणार अंत्यसंस्कार, केळगाव शोकसागरात

By admin | Updated: June 23, 2017 22:58 IST

जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर शनिवारी केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
सिल्लोड(औरंगाबाद), दि. 23 - जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर शनिवारी केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री त्यांच्या वीरमरणाची बातमी कळताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.  संदीपचे एक दिवसापूर्वीच आपल्या वडीलांशी बोलणे झाले होते. विशेष म्हणजे उद्या, शनिवारी संदीपच्या मुलाचा वाढदिवस आहे. दुर्दैवाने मुलाच्या वाढदिवसाच्याच दिवशी पित्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, संदीप जाधव यांचं पार्थिव औरंगाबादमध्ये दाखल झालं असून शनिवारी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आता वाढदिवस साजरा करावा की शहीद दिन साजरा करावा अशा द्विधा मन:स्थितित संदीपचा परिवार आहे. 
 
गुरूवारी जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानी बॉर्डर एक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात संदीप सर्जेराव जाधव शहीद झाले. संदीप जाधव शहीद झाल्याची बातमी सर्व टीव्ही चॅनल्सवर सुरु होती. ही बातमी केळगाव वासियांसाहित सर्व राज्यातील जनतेने बघितली. परंतू संदीपच्या वडिलांशिवाय कुटुंबातील लोकांना रात्रभर ही माहिती कळुच दिली नाही. संदीप जाधवच्या वडीलांनी रात्री 9:30 ला टीव्ही सुरु केला आणि तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीने तिच्या वडीलाचे फ़ोटो बघितले आणि पप्पा म्हणून ओरडली, आजोबांनी लगेच टीव्ही बंद केला अन् छातीवर दगड ठेवून रात्रभर ही बातमी कुणालाच कळू दिली नाही.
 
मुलाच्या वाढदिवशी बापावर अंत्यसंस्कार ...
संदीप जाधवचा मुलगा शिवेंद्रचा आज शनिवारी पहिला वाढदिवस आहे. गुरुवारी संदीप ला वीर मरण आले. शुक्रवारी तांत्रिक अडचणी मुळे संदीप चे प्रेत केळगावला येवू शकले नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर सिल्लोड तालुक्यातील केलगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे . आता वाढदिवस साजरा करावा की शहीद दिन साजरा करावा अशा द्वि धा मनस्थितित संदीपचा परिवार आहे.
 
संदीप हा 2002 मध्ये सैन्यात भरती झाला होता. 15 वर्ष त्याची नोकरी झाली होती . अवघ्या दीड वर्षात तो सेवानिवृत्त होणार होता, पण नियतीला हे मान्य नव्हते . दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात संदीपला वीरमरण आले. संदीपचे मोठे भाऊ रविंद्र व वडील सर्जेराव हे शेती करतात. संदीपच्या पश्चात तीन वर्षाची मुलगी मोनिका व एक वर्षाचा मुलगा शिवेंद्र तसेच पत्नी उज्वला आई वडील असा परिवार आहे.
 

कुटुंबातील लोकांना धक्का बसेल म्हणून ही बातमी लपवली असली तरी रात्रभर ते हे दुःख लपवून एकांतात रडत बसले होते. संपूर्ण केळगाव व परिसरातील लोक या घटनेमुळे स्तब्ध झाले होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत संदीपच्या कुटुंबाला ही बातमी कळू नये यासाठी गावकऱ्यांनी नियोजन केले होते. मिडियाच्या लोकांनाही शुक्रवारी सकाळी 10 पर्यंत बाहेरच थांबविण्यात आले होते. सकाळी प्रशासनाचे अधिकारी ,पोलिस बघुन या घटणेचा उलगड़ा झाला. या घटनेमुळे केळगाव सहित सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

 एक दिवसांपूर्वी झाले होते अखेरचे बोलणे-

संदीप जाधव यांनी बुधवारी आपल्या वडिलांना फोन करून कुटुबांच्या व्यक्तींची खुशाली विचारली होती. बाबा मी चांगला आहे तुम्ही कसे आहात . माझ्या मुलाचा वाढदिवस आहे मी बोर्डर वर असल्याणे येवू शकत नाही. पण तुम्ही मुलाचा वाढदिवस साजरा करा मी लवकरच येतो. असे बोलुन् संदीप ने फोन कट केला.

केळगाव येथील सेवानिवृत्त सैनिक.......

केळगाव या गावातील अतापर्यन्त पंचवीस जवान हे देशसेवेसेत कार्यरत असून याची सुरुवात सन् 1982 सालापासून सुरु झाली.गावातील विलास कौतिक सुल्ताने यांनी 1982 साली सैन्यात दाखल होऊन ही सुरुवात केली.त्यानंतर विश्वनाथ खंडू शिंदे 1987,निवृत्ति परसराम मुळे 1988, भिकुलाल भालचंद्र बड़ोदे 1986,मानिकराव उत्तम गरुड़ 1996, गोकुळ हरी इवरे 1995,चिंधाराम रामदास निंभोरे 1984 ,रामदास भिकन मख 1989 या सनिकांनी देशसेवेसाठी आयुष्य वेचुन सेवानिवृत्त झाले असले तरी मात्र गावातील युवकांना देशसेवेसाठी प्रव्रुत्त केले.व तब्बल पंचवीस युवक हे आज मिल्ट्री मध्ये देशसेवेसाठी आपले कर्तुत्व बजावत आहे.

सैन्यात कार्यरत असलेले गावातील जवान.......

योगेश पोतदार,ज्ञानेश्वर मुळे,सोमनाथ विट्ठल कोल्हे,गजानन विश्वनाथ माखोडे,लक्ष्मण सुखदेव मुळे,कैलास तुकाराम मख,बबलू संजय जाधव,विकास जगन पवार,जगदीश भीमराव कोठाळकर, राजू भगवान डाखोरकर,समाधान साळुबा पगारे,दत्तू विश्वनाथ आदमाने,अमोल विश्वनाथ शिंदे यांच्यासह अजुन दहा ते बारां जवान सैन्यात सेवा बजावत आहे.

केळगाव येथील तीसरे जवान शहीद.....

यापुर्वी केळगाव येथील माधव नारायण गावंडे 8 जुलै 2003, कळुबा भावराव बनकर 27 फेब्रुवारी 2010 साली देशसेवा बजावत असताना शहीद झाले होते. तर 22 जून गुरुवार 2017 रोजी दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात प्रत्युत्तर देताना संदीप जाधव यांना वीरमरण आले.