लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना शहीद झालेले गोगवेपैकी तळपवाडी (ता. शाहूवाडी) येथील जवान सावन बाळकू माने यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. पार्थिव शुक्रवारी पुणे येथेआणण्यात आले असून शनिवारी सकाळी लष्करी हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळ येथे आणण्यात येईल. तेथून वाहनाने गोगवेपैकी तळपवाडी येथील घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास अंत्यसंस्कार होतील़
शहीद जवान मानेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
By admin | Updated: June 24, 2017 04:04 IST