शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इतमामात शहीद विकासवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: September 20, 2016 19:03 IST

‘अमर रहे...अमर रहे..शहीद विकास अमर रहे..’ चे गगनभेदी नारे आणि जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत वातावरणात शासकीय इतमामात शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके

ऑनलाइन लोकमतनांदगाव खंडेश्वर, दि. २० : ‘अमर रहे...अमर रहे..शहीद विकास अमर रहे..’ चे गगनभेदी नारे आणि जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत वातावरणात शासकीय इतमामात शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे धाकटे बंधू मयूर उईके यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी शहीद विकासच्या माता-पित्यांसह भावंडांच्या प्रचंड वेदनादायी आक्रोशाने अख्खे नांदगाव गहिवरले होते.

सोमवारी सकाळीच जम्मू-काश्मिरनजीक उरी येथील सैन्यतळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात नांदगावचा पूत्र विकास ऊर्फ पंजाब उईके वीरगतीला प्राप्त झाल्याचे वृत्त नांदगावात धडकले होते. तेव्हापासूनच उईके यांच्या घरासमोर आणि गावांतील गल्लीबोळात गर्दी जमू लागली होती. कुटुंबीयांचा आक्रोश तर अविरत सुरूच होता. आई बेबीताई, वडील जानराव, बहीण प्रीती आणि भाऊ मयूर सर्वस्व हरवल्यागत शून्यात नजर लावून बसले होते. सायंकाळी पार्थिव नांदगावात पोहोचणार असल्याची माहिती मिळाल्याने गावकरीदेखील डोळ्यांत प्राण आणून लाडक्या विकासच्या पार्थिवाची प्रतीक्षा करीत होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शहीद विकासच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती दिली.

मंगळवारी पहाटेपासूनच जिल्ह्यासह तालुक्यातील गावागावांतून लोकांनी अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावली होती. सकाळपासूनच ‘अमर रहे..शहीद विकास अमर रहे..’ ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘निम का पत्ता कडवा है..पाकिस्तान ... है’ अशा नाऱ्यांनी आसमंत दणाणला होता. भगिनींनी गावातील रस्ते स्वच्छ करून सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. कित्येक ठिकाणी फुलांची आरासही करण्यात आली होती.

दुपारी १२.४५ मिनिटांनी शहीद विकासचे पार्थिव लष्कराच्या ताफ्यासह नांदगावात पोहोचले. आपल्या काळजाच्या तुकड्याचे तिरंग्यात लपेटून आलेले पार्थिव पाहताच आईने हंबरडा फोडला. वडिलांनीही आतापर्यंत थोपवून धरलेल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. फुलांनी सजविलेल्या रथातून शहीद विकासची अंत्ययात्रा गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. रस्त्यावर ठिकठिकाणी शहीद विकासला अंतिम नमन केले. पश्चात शहीद विकासचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सुसज्ज केलेल्या लाखाणी ले-आऊटमध्ये नेण्यात आले.

पोलीस प्रशासनाच्यावतीने तेथे शहीद विकासला मानवंदना देण्यात आली. २० शिपाई व एका अधिकाऱ्यासह २१ जणांनी यावेळी शहीद विकासला ६० राऊंड फायर करून सलामी दिली. पश्चात विकासचा लहान भाऊ मयूर याने त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला.

यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. रामदास तडस, आ. बच्चू कडू, आ. अनिल बोंडे, आ.वीरेंद्र जगताप, आ.आशिष देशमुख, अरूण अडसड, माजी आमदार सुलभाताई खोडके, निवेदिता चौधरी, अभिजित ढेपे, नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, संजय बंड, बाळा भागवत, दिनेश सूर्यवंशी, नीलेश विश्वकर्मा, सुनील वऱ्हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत, बाजार समितीचे सभापती विलास चोपडे, पंचायत समिती सभापती शोभा इंगोले यांच्यासह पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

बेलोरा विमानतळावर मानवंदनाबडनेरा : शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांचे पार्थिव बेलोरा विमानतळावर पुलगाव येथील आयुधनिर्माणच्या जवानांनी शहीद विकास यांचे पार्थिव सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी स्वीकारले. त्यानंतर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने शहीद विकास उईके यांना मानवंदना देण्यात आली. राज्य शासन व अमरावती जिल्ह्यातील नागरिकांच्यावतीने पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, निवेदिता चौधरी, अजय सारसकर यांनी पक्षाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. मुस्लिम बांधवाने दिली अंत्यसंस्कारासाठी जागास्थानिक रहिवासी अमिन लाखाणी यांनी शहीद विकास उईके यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या लाखाणी ले-आऊटमधील जागा उपलब्ध करून दिली. हिंदू-मुस्लिम एकतेचा त्यांनी यातून परिचय दिला. त्यांच्या या कृतीने गावकरी भारावून गेले. शिमल्यातील मित्राने पाठविला शोकसंदेश नांदगावातीलच रहिवासी व सध्या शिमला येथे सैन्यदलात कार्यरत विवेक सवई हा विकास उईकेचा जीवलग मित्र. आपल्या मित्राच्या वीरमरणाची बातमी कळताच त्याने शिमल्याहून आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला आणि कातर भावना व्यक्त केल्यात. भाजप प्रदेश प्रवक्त्यांनी केले सांत्वन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी शहीद विकास उईके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी भाजपचे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पदाधिकारी हरिश्चंद्र पाटील खंडाळकर, प्रशांत वैद्य, मनोहर नरखेडकर, विलास वितोंडे, सुनील दळवी, अरुण गुल्हाने, गणेश पाडर, अमित दहातोंडे, रवी राऊत, दिलीप मोरे, राजेंद्र हजारे उपस्थित होते.