शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कक्षेत आल्यावर इंधन किमती कमी होणार, मुनगंटीवार यांची माहिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:34 IST

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक महाग किमतीला पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. हे वास्तव असले तरी हे दोन्ही जीएसटीच्या कक्षेत आल्यानंतर त्यांच्या किमती निश्चितपणे कमी होतील, असा विश्वास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

मुंबई  -  देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक महाग किमतीला पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. हे वास्तव असले तरी हे दोन्ही जीएसटीच्या कक्षेत आल्यानंतर त्यांच्या किमती निश्चितपणे कमी होतील, असा विश्वास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.मुनगंटीवार म्हणाले, पेट्रोल-डिझेल या दोन्ही गोष्टी जीएसटीखाली आणण्याची तरतूद जीएसटी कायद्यात करण्यात आली असून याबाबत देशातील ३१ राज्यांचे एकमत झाले की त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पेट्रोल-डिझेलवर ३८ ते ४८ टक्के इतका कर (अधिभारासह) आहे. उद्या ते दोन्ही जीएसटी अंतर्गत आले तरी जास्तीतजास्त २८ टक्के इतकाच कर लागेल आणि परिणामत: किमती कमी होणार आहेत.राज्याच्या उत्पन्नात वाढनुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या उत्पन्नातही चांगल्या प्रकारे वाढ झाली असून जवळपास प्रत्येक विभागाला जे लक्ष्य दिले होते त्याहून अधिक उत्पन्न राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. मुद्रांक शुल्क विभागाला २१ हजार कोटी रुपयांचे लक्ष्य दिले होते. त्या विभागाने २५ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा करून दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यात रोजगाराचे प्रमाण घटले, उद्योगांच्या संख्येत घट झाली याबाबत राज्य सरकारवर टीका केली. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही. उद्योग नोंदणीच्या संख्येत एका बाजूला घट झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात रोजगाराच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत असून त्या प्रमाणात भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याचे जवळपास निश्चित झालेले आहे. मात्र यासंदर्भात ११ तारखेला होणाऱ्या बैठकीनंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपGovernmentसरकारGSTजीएसटीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार