शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्या,पालेभाज्यांचे भाव दुपटीने वाढले

By admin | Updated: June 5, 2017 00:47 IST

चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आवकेत घट झाल्याने भावात या आठवड्यात भाव ही कमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कचाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आवकेत घट झाल्याने भावात या आठवड्यात भाव ही कमी झाले. कांदा, जळगाव भुईमुग शेंगा, बटाटा लसूण भाव कमी झाले.राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात पालेभाज्यांची आवक कमी झाली. शेलपिंपळगाव उपबाजारात भाज्यांची आवक घटली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, पालक व मेथीची आवक कमी झाली. जनावरांच्या बाजारात बैल, जर्शी गाय, शेळ्या-मेंढ्या व म्हशींच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ९३ ते ९५ लाख रुपये झाली.चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ४५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १२५२ क्विंटलने घटल्याने भावात ५० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव ६०० रुपयांवरून ५५० रुपयांवर पोहचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ६१५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९८५ क्विंटलने घटली व कमाल भाव ८०० रुपये झाले. जळगाव भूईमुग शेंगाची एकूण आवक २ क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४ क्विंटलने कमी झाली. या शेंगांचा कमाल भावही ६ हजार रुपयांवर आला या सप्ताहात तो १००० रुपयाने वाढला. बंदूक भुईमुग शेंगांचीआवक झाली नाही. लसणाची एकूण आवक २ क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक व ४ क्विंटल ने घटली कमाल भावही ४ हजार रुपयांवर स्थिर झाला.हिरव्या मिरचीची एकूण आवक ५८ क्विंटल झाली. भावात मोठी वाढ झाली. हिरव्या मिरचीला ६,००० ते ८,००० रुपये असा कमाल भाव मिळाला. आवक व बाजारभाव : कांदा - एकूण आवक-४५० क्विंटल. भाव क्रमांक १ - ५५० रुपये, भाव क्रमांक २-४०० रुपये, भाव क्रमांक ३-३०० रुपये. बटाटा - एकूण आवक - ६१५ क्विंटल. भाव क्रमांक १-८०० रुपये, भाव क्रमांक २-७०० रुपये, भाव क्रमांक ३-४०० रुपये. फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : टोमॅटो - १८० पेट्या (२००० ते ४००० रू), फ्लॉवर-१९० पोती (८०० ते १४०० रु), वांगी-२१ पोती (४००० ते ५००० रुपये.), भेंडी - २०५ पोती (२००० ते ४००० रुपये), कारली - १० डाग (५० ते ७००० रुपये), दुधीभोपळा - ४२पोती (१५०० ते २५०० रुपये.), काकडी-३२पोती (१५०० ते २५०० रुपये),गवार-११ पोती ( ३५०० ते ४५००); शेवगा - १२ पोती (३००० ते ५००० रुपये).