पुणे : मागील आठवड्यात सोमवारच्या बंदमुळे झालेली फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरातील घसरण रविवारी थांबली. ४ दिवसांच्या घसरणीनंतर मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दर स्थिर होते.मार्केट यार्डातील फुलबाजारामधील कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी मिळावी, या मागणीसाठी मागील सोमवारी बंद पाळण्यात आला. त्याचा मोठा फटका बाजाराला बसला. यामुळे सलग ४ दिवस दरामध्ये घट झाली. अखेर रविवार दर पूर्वपदावर आले. रविवारी एकूण दीडशे ट्रक शेतमालाची आवक झाली.पुणे विभागातून १५० ट्रक कांदा रविवारी बाजारात उतरला. इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक परिसरातून ६० ते ७० ट्रक बटाट्याची आवक झाली. मध्य प्रदेशातून ४००० गोणी लसूण दाखल झाला. आवक कायम असूनही लसणाचे भाव थोडे उतरले. टोमॅटोची आवक व मागणी स्थिर असल्याने दरदेखील मागील आठवड्याइतकाच होता. या फळभाजीची पाच ते साडेपाच हजार पेटी आवक झाली. १४ ते १५ टेम्पो कोबी बाजारात आली. यापैकी ३ ट्रक कोबी कर्नाटकातून आली. १४ ते १५ टेम्पो फ्लॉवर मार्केटमध्ये दाखल झाला. बहुतेक सर्व भाज्यांचे दर स्थिर असताना कांद्याचे दर मात्र कमी झाले. मागील आठवड्यात १३० ते १५० रुपये प्रति १० किलो असलेला कांदा रविवारी ९० ते ११० रुपयांपर्यंत घसरला. विशेष म्हणजे, रविवारी कांद्याची आवक मागील आठवड्यापेक्षा खूप कमी झाली. रविवारी १५० ट्रक कांदा बाजारात आला. मागील आठवड्यात ही आवक तब्बल २५० ट्रक होती. पुणे विभागातून ३५० ते ४०० गोणी सातारी आल्याची आवक झाली. सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, चिंच १०० पोती बाजारात दाखल झाली. मध्य प्रदेशातून ४ ते ५ ट्रक मटारची आवक झाली. राजस्थानातून ४ ट्रक गाजर, कर्नाटक व मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो मिरची, आंध्र प्रदेश व तमिळनाडूतून ४ ते ५ टन शेवगा, तर कर्नाटकमधून ३ ते ४ टेम्पो कैरी बाजारात आली.फळभाज्यांचे दहा किलोचे दर : कांदा : ९०-११०, बटाटा : ६०-१२०, लसूण २००-४००, आले : सातारी : ३९०-४००, भेंडी : ३५०-४५०, गवार : गावरान : ६००-७०० सुरती : ४००-५००, टोमॅटो : १००-१४०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ४००-४५०, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी : ३५०-४००, पांढरी : २००-२५०, पापडी : १८०-२००, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ५०-८०, कोबी : ५०-१००, वांगी : ७०-१४०, डिंगरी : २००-२२०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : २५०-३५०, तोंडली : कळी : २४०-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २००-२२०, गाजर : १२०-१६०, वालवर : २००-२२०, बीट : ४०-६०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३५०-४५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : १८०-२२०, मटार : स्थानिक : ५००-५५०, परराज्य ४००-४५०, पावटा : ३००-३५०, तांबडा भोपळा : ६०-१००, कैरी : तोतापुरी : ४०० ते ४५०, गावरान : २५०-३००, चिंच : अखंड : १५०-२००, फोडलेली ४००-४१०, सुरण : २४०-२५०, नारळ : १०००-१२००, मका कणीस : (शेकडा) : २००-३००. (१० किलो) ५०-८०.पालेभाज्यांचे शेकड्यातील दर : कोथिंबीर २००-६००, मेथी ५००-९००, शेपू ३००-५००, कांदापात ५००-८००, चाकवत ३००-४००, करडई ३००-४००, पुदिना २००-३००, अंबाडी ४००-५००, मुळे ५००-८००, राजगिरा ४००-५००, चुका : ३००-५००, चवळई ३००-४००, पालक ३००-५००, हरभरा गड्डी ३००-५००.फळांचे दर : लिंबे (गोणीस) : ३०० ते १२००, अननस (डझन) ७०-३००, मोसंबी : (३ डझन) : ११०० ते २३०, (४ डझन) : ४०-९०, संत्री : (३ डझन) ११०-२६०, (४ डझन ) : ४०-१००, डाळिंब (प्रति किलोस) : गणेश २०-८०, आरक्ता २०-८०, भगवा : ४०-१८०, पपई (२० नग) ३-१०, कलिंगड ५-१०, खरबूज १०-२०, पेरु (१० किलो) २५०-६५०, स्ट्रॉबेरी ५० ते १२०, द्राक्षे : सोनाका (१५ किलो) ६००-१०००, जम्बो (१० किलो) १०००-१२००, थॉमसन (१५ किलो) ४००-६००. सफरचंद : काश्मिरी डेलिशिअस (१५ किलो) : ७००-१०००, सिमला (२० किलो) : १४००-१७००. आंबा : लालबाग (४ डझन) : ५००-७००, कर्नाटक हापूस (४ डझन) : १५००-२०००. (प्रतिनिधी)1फळे महागली : बाजारामध्ये रविवारी लिंबाची २ ते ३ हजार गोणी आवक झाली. आवक कमी झाल्यामुळे भावात वाढ झाली. उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढत असतानाच आवक सातत्याने घटत आहे. लिंंबाला ३०० ते १२०० रुपये दर मिळाला. डाळिंबाचीही आवक घटली असून किमतीत ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली. रविवारी डाळिंबांची सुमारे १५ टन आवक झाली. द्राक्षांची आवक २५ ते ३० टन इतकी झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत द्राक्षांची आवक थोडी जास्त झाली असली तरी मागणी वाढल्यामुळे १० टक्के भाववाढ झाली. 2इतर फळांच्या किमती वाढत असतानाच स्ट्रॉबेरीच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी घटल्या आहेत. रविवारी स्ट्रॉबेरीला ५० ते १२० रुपये भाव मिळाला. उन्हाळ्यात मोठी मागणी असलेल्या कलिंगडाची ६० ते ७० टेम्पो आवक झाली. २० ते २५ टेम्पो खरबूज बाजारात दाखल झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत दोन्ही फळांचे दर स्थिर आहेत. सफरचंदाची ८०० ते १०० पेटी आवक झाली. काश्मिरी डेलिशिअस सफरचंदाला (प्रति १५ किलो) ७०० ते १०००, तर सिमला सफरचंदाला (प्रति २० किलो) १४०० ते १७०० रुपये भाव मिळाला.फुलांची आवक कमी, भावात मोठी वाढपाडव्यासारखा महत्त्वाच्या सणानंतर फुलांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. मात्र, त्याची आवक कमी प्रमाणावर झाल्याने किमतीत वाढ झाली. मागील आठवड्यात १० ते ३० रुपये प्रतिकिलो असलेला झेंडू २० ते ५० रुपयांवर गेला. मोगऱ्याने २०० ते ३०० रुपयांवरून ३०० ते ५०० रुपयांवर झेप घेतली. १२ नगाच्या गुलाबगड्डीला १० ते १६ रुपये दर मिळाला. मागील आठवड्यात तो २ ते ८ रुपये होता. ग्लॅडिएटरच्या दरातही मोठी वाढ झाली. जर्बेराची किंमत मात्र स्थिर होती.फुलांचे प्रतिकिलो दर : झेंडू २०-५०, गुलछडी ८०-१२०, बिजली १०-४०, कापरी १०-३०, मोगरा ३००-५००, आॅस्टर (चार गड्डीचे भाव) १०-१६, गुलाबगड्डी (१२ नगाचे भाव) १०-१६, ग्लॅडिएटर १०-१६, गुलछडी काडी २०-५०, डच गुलाब (२० नग) २०-६०, लिलीबंडल (५० काडी) २-५, जर्बेरा ५-१५, कार्नेशियन ३०-६०.
फळभाज्या, पालेभाज्यांचे दर स्थिर
By admin | Updated: March 22, 2015 22:59 IST