शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

खव्याच्या भट्ट्या विझल्या!

By admin | Updated: May 18, 2016 05:30 IST

एक-दोन नव्हेतर तब्बल ७०पेक्षा अधिक कुटुंबे जीवापाड मेहनत घेऊन दर्जेदार खवानिर्मितीच्या व्यवसायात आहेत़

एसपी़ शिंदे,

डोंगरशेळकी (जि. लातूर)- उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी या गावाचे नाव उच्चारले की जिभेवर तरळते ती येथील प्रसिद्ध खव्याची लज्जत़ एक-दोन नव्हेतर तब्बल ७०पेक्षा अधिक कुटुंबे जीवापाड मेहनत घेऊन दर्जेदार खवानिर्मितीच्या व्यवसायात आहेत़ परंतु, यंदा पाऊस नसल्याने या भागातील दुग्धोत्पादन घटले असून, त्याचा मोठा परिणाम खवा उत्पादनावर झाला आहे़ सध्या सरासरीच्या १० टक्केही उत्पादन होत असल्याने डोंगरशळकीकरांची आर्थिक घडी विस्कटून गेली आहे.श्री समर्थ धोंडूतात्यांच्या वास्तव्याने डोंगरशेळकी गावाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे़ गाव डोंगरदऱ्यांच्या रांगांमध्ये वसलेले असल्याने शेती माळरानच़ त्यामुळे पदरी फारसे काही पडतच नाही़ मात्र, चाऱ्याची उपलब्धता असल्याने पशुधन व्यवसाय भरभराटीला आला़ मोठ्या प्रमाणात दुग्धोत्पादन होऊ लागल्याने एकेक करीत तब्बल ७०पेक्षा अधिक पशुपालकांनी खवानिर्मितीच्या व्यवसायात उडी टाकली़ शुद्ध दुधाद्वारे दर्जेदार खवा डोंगरशेळकीत तयार होऊ लागला़ व्यवसायात प्रामाणिकपणा व दर्जा जपल्याने अल्पावधीतच येथील खव्याने बाजारपेठेत चांगला जम बसविला़ संपूर्ण जिल्हाभरात कुठेही खव्याची मोठी गरज असल्यास रात्रीतून ती पूर्ण करण्याची क्षमता डोंगरशेळकीने जपली़ त्यामुळे खवा म्हटले की पहिल्यांदा डोंगरशेळकीचे नाव ओठावर येऊ लागले़ या व्यवसायातून गावातील ७०पेक्षा अधिक कुटुंबे स्थिरस्थावर झाली़ त्यांची संपूर्ण उपजिविकाच या व्यवसायावर स्थिर झाली़ दरम्यान, गेल्या दोन-तीन वर्षांपासून या भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले़ या पावसाळ्यात तर पुरेसा चारा येईल एवढाही पाऊस न झाल्याने पशुपालकांवर पशुधन विकण्याची वेळ आली़ त्यामुळे दुग्धोत्पादनात मोठी घट झाली व त्याचा परिणाम खवा व्यवसायावर झाला़ आजघडीला गावातील अनेक भट्ट्या विझल्या आहेत़ ज्या सुरू आहेत त्यातून अत्यल्प उत्पादन होत आहे़ >चारा-पाणीटंचाईमुळे पशुधन विकले...डोंगरशेळकीतील व्यंकटराव मरेवाड यांच्याकडे चार दुभत्या म्हशी होत्या़ परंतु, चारा व पाणीटंचाईमुळे त्यांनी दोन म्हशी विकल्या़ गणेश मुंढे यांच्याकडेही ६ जनावरे दुभती आहेत़ परंतु, टंचाईमुळे ती पुरेशी दूध देत नसल्याचे मुंढे यांनी सांगितले़ भट्टीसाठी आवश्यक असणारा दूधपुरवठा क्षमतेने होत नसल्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खवा उत्पादन घटले आहे़ अगदी १० टक्केपेक्षाही कमी खवा उत्पादित होत असल्याचे व्यवसायिक गोपीनाथ इंगळेवाड, तुळशीदास मुंढे, रामकिशन शेळके, तुकाराम मुंढे, पटन मुंढे, सुंदरबाई पवार, संतोष रोकडे, रमाकांत मुंढे यांनी सांगितले़