शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 07:09 IST

माहूरगड, सप्तश्रृंगी गड, कोल्हापूर ते तुळजापूर विविध उत्सवाचे रंग 

एक जिल्हा-एक उत्पादन : तुळजापूरमध्ये यंदाच्या महोत्सवात 'एक जिल्हा-एक उत्पादन' या संकल्पनेवर विविध स्टॉल्स उभारले जाणार आहेत. यामुळे स्थानिक कारागिरांना व्यासपीठ मिळेल. भेटीचा सोहळा कधी ? : अंबाबाई व त्र्यंबोलीदेवी भेटीचा सोहळा व कोहळा फोडण्याचा विधी ललिता पंचमीला होईल. अष्टमीला पालखीची नगरप्रदक्षिणा, नवमीला खंडेपूजन व दसऱ्याला रथारूढ रूपातील पूजा बांधण्यात येईल. 

विविध कलांचा जागर : माहूरगडावरील उत्सवात सनई वादन, भक्ती संगीत, कीर्तन, कविसंमेलन, गोंधळ नृत्य, जोगवा, दांडिया, भारुड, नाटिका, आदी विविध ललित कला सादर केल्या जाणार आहेत. खासगी वाहतूक बंद : नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर ६ ऑक्टोबरपर्यंत नांदुरी ते सप्तश्रुंगी गड खासगी वाहतूक बंद राहील.

कोल्हापूरची अंबाबाई देवी यंदा महाविद्या स्वरूपात

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारी घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. यावर्षी आश्विन शुद्ध तृतीया या तिथीत वृद्धी झाल्याने उत्सव दहा दिवस साजरा होईल. या काळात अंबाबाईची पूजा दशमहाविद्यांपैकी सात स्वरूपात बांधण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ६.३० वाजता अंबाबाई देवीची नित्य पूजाभिषेक होईल. 

तुळजाभवानीच्या चरणी पारंपरिक उत्सवांचे रंग

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, यंदा पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत.

रेणुकामातेच्या गजरासाठी माहूरगड सज्ज

माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान येथे शारदीय नवरात्र महोत्सव २ ऑक्टोबरपर्यंत होईल. सोमवारी पहिली माळ असून, माहुरगड उत्सवासाठी सज्ज झाला.  वैदिक महापूजा, वेद घोष, घटस्थापना, श्री दुर्गा शतचंडी पाठ, चतुर्वेद पारायण, छबीना महाआरती,  श्री दुर्गा सप्तशती शतचंडी पाठ, छबिना मिरवणूक यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

सप्तशृंगी देवी दर्शनासाठी व्हीआयपीला कात्री

नवरात्रौत्सवानिमित्त सकाळी सातला जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते श्री सप्तशृंग देवीची पंचामृत महापूजा होईल. त्यानंतर घटस्थापना होईल. भक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाने यंदा व्हीआयपी पासेसला कात्री लावली. नवरात्रोत्सवानिमित्त सुमारे २० लाख भाविक हजेरी लावण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. 

टॅग्स :Navratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५