शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..!

By अतुल कुलकर्णी | Updated: August 3, 2025 10:18 IST

सगळ्यांनी आपल्याला मित्रवर्य देवेंद्रजी असे लिहिले आहे. त्यामुळे पुनरावृत्ती न करता थेट पत्राचा मसूदा आणि लिहिणाऱ्याचे नाव देत आहे.

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

प्रिय देवेंद्रजी, 

नमस्कार... आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस. त्यानिमित्ताने काही नेत्यांच्या मनात तुमच्याविषयीच्या खूप चांगल्या भावना उचंबळून आल्या. त्यांनी त्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितल्या आहेत. आम्ही फक्त पोस्टमनच्या भूमिकेत आहोत. आमची भावना तुम्ही समजून घ्याल याची खात्री आहे. सगळ्यांनी आपल्याला मित्रवर्य देवेंद्रजी असे लिहिले आहे. त्यामुळे पुनरावृत्ती न करता थेट पत्राचा मसूदा आणि लिहिणाऱ्याचे नाव देत आहे.

टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,हा एकच सवाल आहे..!दादूसोबत हातात हात घालून निवडणुकांना सामोरं जावं की तुमच्याशी हातमिळवणी करावी आणि माझ्या मदतीने ठाणेकरांचा पत्ता कट करण्याचं तुमचं इप्सित साध्य होऊ द्यावं...टोटल कन्फ्युजन निर्माण करावं आणि दादूसोबत दाखवावा एकदाचा करिष्मा ठाकरे ‘ब्रँड नेम’चा..? हा एकच प्रश्न छळतो आहे,की पुन्हा एकदा तुम्हाला एकत्र भेटूनलावावा कायमचा सोक्षमोक्ष ‘दाढी’चा..?टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,हा एकच सवाल आहे..!तुमचाच, राज टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,हा एकच सवाल आहे..!खेळू द्यावी आपल्या सवंगड्यांना रम्मी की आपणही काकांसारखं पत्ते पिसून टाकावेत उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची घेऊन जगावं आनंदानं,की फेकून द्यावं पक्षाचं ओझं आणि करावा शेवट सगळ्यांचा एकाच प्रहारानं...पक्षाचा, घड्याळाचा आणि सगळ्यांचा...घ्याव्या पांघरून कमळाच्या पाकळ्या अंगभर, पण मग मिळेल का जागृतीचा किनारा...त्यातून निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागली मुख्यमंत्रिपदाची तर..? की, आयुष्यभर उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची घेऊन बसावं गपगुमान तुम्ही दिल्लीला जाण्याची प्रतीक्षा करत..?टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,हा एकच सवाल आहे..!तुमचाच, अजितटू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,हा एकच सवाल आहे..!माझेच सवंगडी माझे दुश्मन बनू पाहताना धनुष्याचं ओझं किती काळ सहन करायचं..?किती काळ सहन करायचं हे दोन नंबरचं पद..?मी जवळचा की अजित जास्त जवळचा?या प्रश्नानं झोप उडवलेली असताना आता एकच सवाल छळतो आहे...हे मित्रांचा मित्र देवेंद्र, उर्फ देवा भाऊ कधी जाता दिल्लीला मुंबई सोडून...म्हणजे मला पुन्हा एकदा ‘वर्षा’त न्हाऊन निघता येईल, अनोख्या आनंदाने...तुमचाच, एकनाथटू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,हा एकच सवाल आहे..!हे देवेंद्रा, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना मोठं केलं तेच आमच्यावर उलटले आणि दुसऱ्या बाजूला तुला साथ देणाऱ्या आम्हालाही तु विसरतोस...मग या नुसत्या मशालीचे टेंभे घेऊन आम्ही कोणाकडे मैत्रीचा हात पुढे करायचा? दादरचं शिवतीर्थ, मातोश्री आणि वर्षाअसा त्रिवेणी संगम करायचा सोडून कशासाठी करायचा नागपूर, बारामती, ठाणे... असा द्राविडी प्राणायाम?अजूनही वेळ गेली नाही...टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,हा एकच सवाल आहे..!तुमचाच, उद्धव

मैत्री दिनानिमित्त ही पत्र असल्यामुळे किती गांभीर्याने घ्यायची हा निर्णय तुम्ही स्वतः घ्यावा...तुमचाच, बाबूराव

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार