शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

By admin | Updated: March 1, 2017 01:28 IST

जगात वाईट प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात बोकाळल्या असून, त्याचा सामना मुलींनी स्वत: करायला शिकले पाहिजे

धनकवडी : जगात वाईट प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात बोकाळल्या असून, त्याचा सामना मुलींनी स्वत: करायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत व्हावे. विद्यार्थ्यांना मिळणारे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, असेही ते म्हणाले.भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयातील वॉईस्टार स्मरणिकेचे प्रकाशन मंगळवारी झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य एच. व्ही. वनकुद्रे, यशोमती धुमाळ, प्रणाली यावले, तसेच या स्मरणिकेच्या संपादिका शशांकी सिंंग उपस्थित होते.निकम म्हणाले, सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या टीआरपीच्या नादात काय दाखवतात? सध्या चित्रपटातून दाखवल्या जाणाऱ्या दृष्यातून एखाद्याचे डोके भडकू शकते. त्याचे वाईट परिणामही पाहायला मिळतात. सुरुवातीस निकम यांनी ‘तुम्हा पाहुनी मला आठवे तारुण्याचे दिवस आगळे’ ही कविता सादर केली.(प्रतिनिधी)>तरुणांनी सोशल मीडिया काळजीपूर्वक वापरावा पुणे : आज देशाला सुशिक्षित व तत्त्वनिष्ठ युवा पिढीची गरज आहे. सोशल मीडियावर वाहवत जाणारे युवक व युवती आलेल्या संदेशाची शहानिशा न करता फॉरवर्ड करतात. यातून नकळतच चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.नऱ्हे येथील झील एजुकेशन सोसायटीमध्ये अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे ‘युथ अ‍ॅन्ड सोशल मीडिया इथिक्स’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.सुरुवातीस निकम यांचा सत्कार संभाजी काटकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. जयेश काटकर उपस्थित होते. निकम यांच्या हस्ते झील कॉलेज आॅफ इंजिनीरिंग अँड रिसर्चच्या ’उमंग द झील’ या मासिकाचे अनावरण करण्यात आले.