शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजार असणा-यांवर मुंबईत मोफत उपचार - पालकमंत्री मदन येरावार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 21:54 IST

जिल्ह्यातील ज्या रुग्णांना कर्करोग, हृदयरोग आदी दुर्धर आजार आहेत व आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही, अशा निकषात बसणा-या रुग्णांवर आता मुंबईत मोफत उपचार करण्यात येणार आहे

यवतमाळ : जिल्ह्यातील ज्या रुग्णांना कर्करोग, हृदयरोग आदी दुर्धर आजार आहेत व आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही, अशा निकषात बसणा-या रुग्णांवर आता मुंबईत मोफत उपचार करण्यात येणार आहे. या रुग्णांना ने-आण करणे तसेच त्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्थासुध्दा शासनातर्फे करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, तहसीलदार सचिन शेजाळ आदी उपस्थित होते. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्ती, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तिंच्या मदतीसाठी शासन नेहमी तत्पर आहे. लाभार्थ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आपले सरकार आग्रही आहे. कोणत्याही योजनेचा लाभ लाभार्थ्यांना लवकर मिळण्यासाठी प्रशासनाने गांभिर्याने काम करावे. तसेच दुर्धर आजार असणा-या रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधावा. जेणेकरून त्यांना उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात येईल. या संपूर्ण उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत्‍ करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत 9 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यात वीज दुर्घटनेत जखमी झालेले मनोहर नागोसे यांना 4 हजार 300 रुपयांचा, वसंत दुधे यांना उपचारासाठी 12 हजार 700 रुपयांचा आणि कर्करोगग्रस्त विलास दुधे यांना बळीराजा चेतना अभियानातून 10 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. याशिवाय मनोहर चक्रे, अनिता येवले, रेखा गजभिये यांनासुध्दा लाभ देण्यात आला. तसेच श्रावणबाळ आणि संजय गांधी योजनेंतर्गत 48 लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले की, गत दोन वर्षात 861 जणांना संजय गांधी योजनेत तर 1199 लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजनेत लाभ मिळवून देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार तहसीलदार शेजाळ यांनी मानले. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :docterडॉक्टर