शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानाला येणाऱ्यांची मोफत दाढी-कटिंग! लातूरमधील नाभिकाचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 02:01 IST

जलसंवर्धनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी तालुक्यात श्रमदानाची चळवळ गतिमान झाली आहे. त्याला आणखी चालना मिळावी म्हणून गुरधाळ येथील एका नाभिकाने श्रमदात्यांसाठी चक्क शेतीच्या बांधावर मोफत दाढी-कटिंग सुरू केले आहे.

देवणी (जि. लातूर) : जलसंवर्धनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी तालुक्यात श्रमदानाची चळवळ गतिमान झाली आहे. त्याला आणखी चालना मिळावी म्हणून गुरधाळ येथील एका नाभिकाने श्रमदात्यांसाठी चक्क शेतीच्या बांधावर मोफत दाढी-कटिंग सुरू केले आहे. गुरधाळ गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे गावात श्रमदानाचे काम सुरूआहे. मात्र, गावातील काही शेतकरी दाढी- कटींग करण्यासाठी गावात थांबत असल्याचे नाभिक कारागीर गोपाळ गुरधाळकर यांनी पाहिले़ या शेतकºयांचा वेळ वाया जावू नये आणि श्रमदानात सहभाग वाढावा म्हणून त्यांनी बांधावरच दाढी-कटींग सुरू केले आहे.आमीरने दिली टाळ्या वाजवून दादबॉलिवुड स्टार अमीर खानने सुरू केलेला पाणी फाउंडेशनचा उपक्रम शेतकºयांसाठी विशेष लाभदायी आहे. अमीर खानने येथे येऊन श्रमदान करावे आणि मला त्याची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा गोपाळ गुरधाळकर यांनी सोशल मीडियावरून अमीर खानकडे व्यक्त केली होती. यावर आमीरने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.

बारा बलुतेदारांपैकी मी एक आहे़ सर्वांची उपजीविका शेतक-यांवर अवलंबून आहे. शेतक-यांकडे पिकले, तरच आपल्याला मिळणार. शेत बहरावे यासाठी श्रमदानातून पाणी मुरविणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझा हा प्रयत्न आहे.- गोपाळ गुरधाळकरमहाराष्ट्रदिनी महाश्रमदान - आमिर खानपुणे : महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘पानी फाउंडेशन’ संस्थेच्या पाणलोट क्षेत्रातील कामाला वेग आला आहे. महाराष्ट्रदिनी चार हजार गावांमध्ये शहरवासीयांना कामाची संधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती ‘पानी फाउंडेशन’चे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी दिली. खान यांनी पत्रकार परिषदेत महाश्रमदानामागची संकल्पना विशद केली.ते म्हणाले, यंदा महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांतील चार हजारहून अधिक गावे वॉटरकप स्पर्धेसाठी सहभागी झाली आहेत. दुष्काळग्रस्त भागातील गावांत अधिक जोमाने काम सुरू आहे. महाश्रमदानामध्ये सहभागी होऊ इच्छिणाºयांनी जलमित्र पानी फाउंडेशनच्या वेबसाइटवर जवळच्या गावासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.प्रत्येकाला तीन तासांचे काम देण्यात येणार आहे. त्यामुळे या कामात प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींनी सहभागी व्हावे. ग्रामीण भागातले काम पूर्ण झाल्यावर शहरी भागातही पाणी फाउंडेशन भविष्यात काम करणार आहे. असे झाल्यास पुढील पाच वर्षांत ‘पानी फाऊंडेशन’ची गरज भासणार नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र