शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

हाजीअली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा, ट्रस्टची माघार

By admin | Updated: October 24, 2016 12:44 IST

हाजी अली दर्गा ट्रस्टने माघार घेत महिलांना मजारपर्यंत प्रवेश करू देण्यास संमती दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून महिलांना मजारपर्यंत प्रवेश करू देण्यास ट्रस्टने संमती दिली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ' हाजी अलीच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देऊ' असे हाजी अली दर्गा ट्रस्टच्या अधिका-यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी ट्रस्टला ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.
(हाजी अली दर्ग्याचं दार महिलांसाठी खुलं, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय)
(हाजी अली दर्ग्यातील 'महिला प्रवेश' लांबणीवर)
(हाजी अली दर्ग्यात आल्यास तृप्ती देसाईंना देऊ चपलेचा प्रसाद)
 
 
 
मुंबई उच्च न्यायालयाने हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देऊन ऐतिहासिक निर्णय दिला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात हाजी अली दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान हायकोर्टाच्या आदेशावरील स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.  सुनावणीवेळी न्यायालयाने हाजी अली ट्रस्टला पुरोगामी भूमिका मांडण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार 'ट्रस्ट महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेश देण्यावर रिती आणि कार्यपद्धतीच्या योजनांची सकारात्मक आखणी करत आहे', असे वकील सुब्रमण्यम यांनी सांगितले होते. अखेर आज झालेल्या सुनावणदरम्यान हाजी अली दर्गा ट्रस्टने माघार घेतली आणि महिलांचा दर्गा प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला.