शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांच्या नावे केंद्रीय मंत्रालयात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 04:44 IST

डॉ. भागवत यांचा साहाय्यक असल्याची बतावणी : दिल्ली पोलिसात तक्रार

यदु जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा सहाय्यक असल्याचे सांगून थेट केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह व त्यांच्या मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी या मंत्रालयाकडून दिल्ली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी नागपूर कनेक्शनची चर्चा आहे.अविचल नामक व्यक्तीने चौधरी वीरेंद्र सिंह यांचे खासगी सचिव सुधीर फोगाट यांना मोबाइल कॉल केला आणि तो स्वत: डॉ. मोहन भागवत यांचा सहाय्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे चौधरी वीरेंद्रसिंह स्वत: त्याच्याशी बोलले. शहानिशेनंतर अशी कुणी व्यक्ती सरसंघचालकांची सहाय्यक नाही व ज्या मोबाइलव नंबरवरुन कॉल आला होता तो नंबरही डॉ. भागवत यांच्या कार्यालयातील कुणाचाच नाही, असे संघाच्या दिल्ली कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.याच मंत्रालयात आणखी दुसरा प्रकार घडला. स्टील आॅथोरिटी आॅफ इंडियाचे (सेल) कार्यकारी संचालक अलोक सहाय यांनाही अविचलने कॉल केला. डॉ. भागवत यांच्याशी जवळीक आहे. सेलचे अध्यक्षपद ३१ जुलैला रिक्त होत असून या पदावर वर्णी लावण्यासाठी मी आपली मदत करू शकतो, असे त्याने सहाय यांना सांगितले. सहाय, फोगाट यांनी तक्रार केल्यानंतर चौधरी वीरेंद्र सिंह यांचे अन्य एक खासगी सचिव धीरज कुमार यांनी संपूर्ण घटनेची तक्रार दिल्ली गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडे (कमला मार्केट पोलीस स्टेशन) केली. तात्काळ चौकशी करावी, असे तक्रारीत म्हटले.नागपूरचे ‘अविचल’ कनेक्शनअविचल या व्यक्तीचे नागपूर कनेक्शन असल्याचे सांगितले जाते. अत्यंत प्रभावी केंद्रीय मंत्र्याच्या तो निकटवर्ती मानला जातो. हे मंत्री उत्तरप्रदेशातील आहेत. या मंत्र्यांकडे अविचलचा सतत वावर असतो. नागपुरातील भाजपच्या काही बड्या नेत्यांशी तो सलगी करुन असतो, अशी माहिती आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ