शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थाच निघाली बनावट, दोनशेहून अधिक खातेदारांचे १३ कोटी घेऊन पिता-पुत्र पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 05:17 IST

कुरार येथील घटना : नोंदणी न करताही सुरू होता आर्थिक व्यवहार

मुंबई : दोनशेहून अधिक खातेदारांचे १३ कोटी घेऊन पसार झालेल्या पिता-पुत्राने थाटलेली कालिका पतसंस्थाच बनावट निघाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच पोलीस तपासात समोर आली आहे. या पतसंस्थेने कुठल्याही प्रकारची नोंदणी केलेली नसताना, गेल्या ८ वर्षांपासून त्यांचा कारभार सुरू होता.प्रमोदकुमार मिश्रा (५५) याने मुलगा नित्यानंद आणि नीलेशसोबत कुरार परिसरात ही पतसंस्था थाटली. येथे पैसे ठेवणाऱ्यांना ते जास्तीचे व्याज देण्याचे आमिष देत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी पतसंस्थेत गुंतवणूक केली. सुरुवातीला पतसंस्थेतून व्याजाची रक्कम मिळत असल्याने खातेदारांचा विश्वास बसला. त्यांना पतसंस्थेतून रितसर पासबुक, तसेच अन्य सुविधा पुरविल्या होत्या.

गेल्या ८ वर्षांत दोनशेहून अधिक जणांनी यात गुंतवणूक केली. मात्र, २०१७ मध्ये पैसे घेऊन शर्मा पिता-पुत्राने पळ काढला. पैसे घेऊन संचालकच पळाल्याने खातेदारांची तारांबळ उडाली. त्यांनी कुरार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. राहुल गुप्ता यांच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

हा तपास मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढे तपासात ही पतसंस्था अधिकृत नसल्याचे समोर येत आहे. त्यांनी परराज्यातून बनावट प्रमाणपत्राद्वारे राजरोसपणे ठगीचा धंदा थाटला असल्याचा अंदाज आहे. तिघेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यामागे कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे कक्ष ७ याचा अधिक तपास करत आहेत.