पाटण (जि. सातारा) : कोयना धरणातून पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी देण्यात येणारा आणि लवादाने निर्धारित केलेला पाणीसाठा नाममात्र शिल्लक राहिल्याने १ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा चौथा टप्पा बंद करण्यात आला.कोयना धरणात सध्या २७.४५ टीएमसी पाणी शिल्लक असून, धरणातील पाण्याचे वाटप लवादाच्या निर्देशानुसार केले जाते. पश्चिमेकडील वीज प्रकल्पांसाठी ६७.५९ तर पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी ३० टीएमसी पाणी दिले जाते. धरणातून आत्तापर्यंत पूर्वेकडील सिंचन प्रकल्पांसाठी २६.६९ टीएमसी तर दररोज ०.१८ टीएमसी पाणी दिले जात होते. तसेच पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी ६७.१५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. पश्चिमेकडील वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविल्याने वीज प्रकल्पांसाठीचा पाणीसाठा संपल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोयना वीजनिर्मितीचा चौथा टप्पा बंद
By admin | Updated: May 3, 2017 03:31 IST