शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची चौथी यादी जाहीर

By admin | Updated: July 19, 2016 04:11 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली.

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. या यादीत १ हजार २२८ नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून, अजूनही केवळ दोन विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, बेटरमेंटसह एकूण १५ हजार ५२४ विद्यार्थ्यांना चौथ्या यादीत महाविद्यालय मिळाले असून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा कट आॅफही बराच घसरल्याचे दिसले.तिसऱ्या यादीपर्यंत ९० टक्क्यांपलीकडे स्थिरावलेला कट आॅफ चौथ्या यादीत मात्र ९० टक्क्यांखाली उतरला. मात्र काही नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश हाऊसफुल्ल झाल्यानेच कट आॅफचा टक्का घसरल्याची माहिती आहे. चौथ्या गुणवत्ता यादीमध्ये एकूण १४ हजार २८३ विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे या यादीमध्ये एकूण ५ हजार ९४१ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर २ हजार ९६१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि १ हजार ८२९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन आॅनलाइन प्रवेश रद्द करायचा आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, पहिला प्रवेश रद्द केल्यानंतरच पुन्हा प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन तो निश्चित करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना १९ व २० जुलैदरम्यानचा कालावधी उपलब्ध आहे. तरी कोणत्याही विद्यार्थ्याने आॅफलाइन प्रवेश घेऊ नये, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, याची शाश्वतीही उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.दरम्यान, चौथ्या यादीनंतरही केवळ दोन विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नसून, त्यांच्यासाठी लवकरच समुपदेशन फेरीची व्यवस्था करणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नोंदणीची संधी देण्याचा विचार उपसंचालक कार्यालयातून सुरू असल्याचे कळाले. (प्रतिनिधी)