मुंबई : घराबाहेर खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलीला खाऊचे अमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना मंगळवारी गोवंडीच्या शिवाजी नगर येथे घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत साजिद खान (२६) याला अटक केली आहे. येथील बैंगणवाडी परिसरात ही मुलगी आई-वडीलांसह राहते. मंगळवारी दुपारी ती घराबाहेर खेळत असताना तिच्याच घरासमोर राहणारा साजिद याने तिला खाऊचे अमिष दाखवत तिला घरी नेत बलात्कार केला. मुलीने ही बाब आईवडीलांना सांगतात लगतच्या रहिवाशांनी त्याला चोप देत शिवाजी नगर पोलीसांच्या स्वाधीन केले. आरोपीवर बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
गोवंडीत चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 05:53 IST