शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फास्टॅग नसल्यास चारचाकी वाहनांना द्यावा लागणार दुप्पट टोल

By appasaheb.patil | Updated: November 19, 2019 15:08 IST

चार चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य; १ डिसेंबरपासून टोलची रक्कम फास्टॅगच्या माध्यमातून घेतला जाणार

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या २१ नोव्हेंबर २०१४ च्या राजपत्रानुसार ही कार्यवाही केली जाणाररस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने १९ जुलै २०१९ रोजी विशेष निर्देश पत्रही जारी १ डिसेंबर २०१९ पासून पथकर फास्टॅग च्या माध्यमातून घेतला जाणार

सोलापूर : केंद्र सरकारच्या निदेर्शानुसार १ डिसेंबर २०१९ पासून पथकर नाक्यावर चार चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांकडून १ डिसेंबर २०१९ नंतर दंडापोटी दुप्पट पथकर वसुली करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.

केंद्र सरकारच्या २१ नोव्हेंबर २०१४ च्या राजपत्रानुसार ही कार्यवाही केली जाणार आहे. या राजपत्रानुसार रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने १९ जुलै २०१९ रोजी विशेष निर्देश पत्रही जारी केले आहे. त्यांनी सांगितले की १ डिसेंबर २०१९ पासून पथकर फास्टॅग च्या माध्यमातून घेतला जाणार आहे. यानंतर रोखीने पथकर देणा?्या वाहनचालकांना दंडापोटी दुप्पट टोल आकारला जाणार आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनाने फास्टॅग साठीच्या लेनमध्ये प्रवेश केल्यास अशा वाहनांकडूनही दुप्पट पथकर आकारला जाणार आहे.

फास्टॅग खरेदीसाठी  आवश्यक कागदपत्रे....वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट, वाहनधारकांचे पासपोर्ट साईज फोटो, केवायसीसाठी कागदपत्रे ( वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार ओळखपत्र किंवा पासपोर्ट )

फास्टॅग कोठे मिळेल ........ सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर, वरवडे पथकर नाका, तामलवाडी, येडशी, पारगांव पथकर नाका.आयसीआयसीआय, एचडीएफसी, अक्सिस, इंडस आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखा याशिवाय इंटरनेटवरील वेबसाईटवरही खरेदी करता येईल.

फास्टॅगचे फायदे.........पथकर नाक्यावर थांबावे लागणार नाही, इंधन बचत, पर्यावरण संवर्धन, वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. फास्टॅग वर मिळणार कॅशबॅक -  केंद्र सरकारच्या धोरणानुसार फास्टॅगद्वारे पथकर देणारे वाहनांना ३१ मार्च २०२० पर्यंत २.५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरtollplazaटोलनाकाcarकारRto officeआरटीओ ऑफीसroad transportरस्ते वाहतूक