शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विदर्भाला मिळणार चार नवे कृषी महाविद्यालय!

By admin | Updated: July 17, 2015 01:51 IST

वाशिम जिल्हय़ात होणार कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय.

अकोला : विदर्भातील विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे वाढता कल आणि कमी पडत असलेल्या जागा बघता शासनाने चार नवे कृषी महाविद्यालय विदर्भात देण्याचा निर्यण घेतला असून, गोंदिया, गडचिरोली आणि वाशिम या तीन जिल्हय़ांसाठी नवे कृषी महाविद्यालय देण्यात यावे, यासाठीचा ठराव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीईएआर) ११ जुलै रोजी घेतला आहे. यवतमाळ जिल्हय़ाला एक कृषी महाविद्यालय मंजूर झाले आहे. विदर्भातील युवा शेतकरी वर्ग शेतीकडे वळत असून, शेतात नवे प्रयोग करीत आहे. त्यासाठी कृषी शिक्षण घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. विद्यार्थ्यांचा कलही कृषी शिक्षणाकडे वाढला आहे, पण कृषी अभ्यासक्रमाच्या जागा कमी असल्याने अनेक विद्यार्थी कृषी अभ्याक्रमापासून वंचित आहेत. या पृष्ठभूमीवर विदर्भात कृषी महाविद्यालयाचा विस्तार वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विदर्भात आजमितीस ९ शासकीय कृषी महाविद्यालय असून, खासगी महाविद्यालयाची संख्या २२ आहे. यात आता यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडानजीक एक कृषी महाविद्यालय मिळाल्याने ही संख्या २३ झाली आहे. आणखी तीन कृषी महाविद्यालयाला एमसीएआरने मान्यता दिल्याने ही संख्या २६ होणार आहे. या तीन विनाअनुदानित नवीन कृषी महाविद्यालयामध्ये गडचिरोली जिल्हय़ात चार्मोशी येथे कृषी महाविद्यालय, गोंदिया जिल्हय़ात सडक अर्जुनी येथे कृषी व्यवसाय व्यवस्थापन तर वाशिम जिल्हय़ातील आमखेड येथे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय देण्यासाठीचा निर्णय एमसीईएआरने घेतला आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली व वाशिम जिल्हय़ाला नवे पदवी कृषी महाविद्यालय देण्यासाठीचा प्रस्ताव पारित केला आहे. कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल बघता, हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. श्रीकांत काकडे यांनी स्पष्ट केले.