शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूलसह चार जिवंत काडतूस जप्त

By admin | Updated: January 8, 2016 02:16 IST

शेगावातील दोन युवक गजाआड, आकोट फैल पोलिसांची कारवाई.

अकोला: शेगावहून अकोल्यातील आकोट फैल भागामध्ये विदेशी बनावटच्या पिस्तूलसह चार जिवंत काडतूस विक्रीसाठी आणणार्‍या दोन युवकांना आकोट फैल पोलिसांनी गुरुवारी मोठय़ा शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून पिस्तुलसह काडतूस पोलिसांनी जप्त केले असून, ते ज्या ऑटोरिक्षाने अकोल्यात आले होते, ती ऑटोरिक्षाही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शेगाव येथील पंचशीलनगरमधील रहिवासी सुदर्शन ऊर्फ गोलू गोपाल उकर्डे (२२) व राहुल शिवाजी शिरसाट (३0) हे दोघे एमएच ३८-३९८६ क्रमांकाच्या ऑटोरिक्षाने शेगावहून अकोल्यात येत होते. त्यांच्याकडे पिस्तूल व चार जिवंत काडतूस असल्याची माहिती आकोट फैल पोलिसांना बुधवारी सायंकाळी मिळाली. या माहितीच्या आधारे आकोट फैल पोलिसांनी शेगाव ते अकोला मार्गावर पाळत ठेवली. ते दोघेही ऑटोरिक्षाने आकोट फैल परिसरात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर येताच पोलिसांनी वाहन अडवून दोन्ही युवकांची झडती घेतली. यावेळी एका युवकाजवळ तब्बल ७00 ते ९00 ग्रॅम वजन असलेले पिस्तूल व दुसर्‍या युवकाजवळ चार जिवंत काडतूस आढळून आले. ते ज्या ऑटोरिक्षाने अकोल्यात दाखल झाले, ती ऑटोरिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. नवीन वर्षात पिस्तूल जप्तीची ही पहिली कारवाई असून, अकोला पोलिसांनी यापूर्वीही देशी व विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहेत. याप्रकरणी दोन्ही युवकांविरुद्ध आकोट फैल पोलीस ठाण्यात आर्म्र्स अँक्टच्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही युवकांना अटक करून त्यांना दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक पी.एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक शिरीष खंडारे, उपनिरीक्षक डी. एस. शिंपी, दिनकर गुडदे, सुरेश वाघ, अश्‍विन शिरसाट, मनोज नागमते, अमर इंगळे, रवि घिवे, ज्ञानेश्‍वर लांडे, गजानन जंजाळ यांनी केली.