ऑनलाइन टीम
सांगली, दि. ३० - सांगली जवळ एसटी व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात चारजणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना निळजे येथील सरकारी रुग्णालयात व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एसटीचा वाहक, एसटीचा एक कर्मचारी, त्याची मुलगी व अन्य एका महिलेचा समावेश आहे.
आज पहाटे पाचच्या सुमारास शेगावहून सांगलीला जाणारी एसटी उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकवर आदळली. एसटीचालकाला सदर ट्रक दिसला नाही किंवा त्याला त्याचा अंदाज आला नाही, परंतु डाव्या बाजुने एसटी भरवेगात ट्रकवर आदळली. सांगलीपासून ४५ किलोमीटर अंतरावर हा भीषण अपघात झाला आहे.