शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातून ४ तरुणींचे अपहरण? एकीने केली स्वत:ची शिताफीने सुटका

By admin | Updated: January 27, 2017 21:25 IST

पुण्यातील चार तरुणींचे अपहरण झाले असून त्यापैकी एफवायबीएस्सीत शिकत असलेल्या तरूणीने नाशिकमध्ये स्वत:ची सुटका करवून घेतली आहे़

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 27  : पुण्यातील चार तरुणींचे अपहरण झाले असून त्यापैकी एफवायबीएस्सीत शिकत असलेल्या तरूणीने नाशिकमध्ये स्वत:ची सुटका करवून घेतली आहे़ यानंतर शुक्रवारी(दि़२७) सायकांळी साडेसहा वाजेच्या सुमारास या तरुणीने पोलीस ठाणे गाठून आपल्यावर ओढवलेल्या प्रसंग सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़पिडीत मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती पुण्यातील कोथरूड येथील एका महाविद्यालयात एफवायबीएस्सीत शिक्षण घेते आहे़ तीन दिवसांपुर्वी महाविद्यालयात जात असतांना एका लाल रंगाच्या कारमधून आलेले तीन पुरुष व एका महिलेने तिचे अपहरण केले. यावेळी गाडीत तिच्यासह अन्य तीन अपहृत मुलीदेखील होत्या. यापैकी एक मुलगी अवघी १३ वर्षांची आहे़शुक्रवारी (दि़२७) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नारायण किसन पाटील हे रिक्षाचालक सीबीएस परिसरात प्रवाशांची वाट पाहत थांबले होेते़ त्यावेळी पिडीत युवती अचानक रिक्षात येऊन बसली व आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत त्वरीत पोलीस ठाण्यात नेण्याची विनंती केली़ त्यानुसार रिक्षाचालक पाटील यांनी तिला पोलीस ठाण्यात सोडले़पिडीत मुलीने पोलिसांना सांगितले की, पुण्यातून तीन पुरुष व एका महिलेने आणखी तीन मुलींचे अपहरण केले असून गत तीन दिवसांपासून उपाशी ठेऊन छळ केला जात आहे. या तरुणीच्या अंगावर ब्लेडने वार केल्याचेही वृत्त आहे़ दरम्यान, अपहरणकर्त्यांचा अद्याप तपास लागलेला नसून पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून शोध सुरू केला आहे़.