शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

बोईसरमध्ये जखारिया कंपनीत स्फोट; एका कामगारांचा मृत्यू, एक बेपत्ता तर सहा जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 10:07 IST

Jakharia Fabric Ltd in Boisar : या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पालघर/बोईसर: तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जखारिया कंपनी लिमिटेड या कपड्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात कारखान्यातील एका कामगाराचा जागीच मुत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे, तर अन्य सहा कामगार जखमी झाले आहेत. (Six injured in a fire that broke out due to an explosion at Jakharia Fabric Ltd in Boisar, Maharashtra)

कारखान्यातील बॉयलरमुळे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटामुळे कारखान्याला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले असले तरी आग धुमसत आहे.

बोईसर औद्योगिक वसाहती मधील जखरिया टेक्स्टाईल या कारखान्यात शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला आहे. स्फोटामुळे कारखान्याला आग लागली आहे. कारखान्यात आठ कामगार काम करीत होते. 

स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका कामगाराचा मृतदेह कारखान्यात आढळून आला आहे, तर छोटेलाल सरोज नामक कामगार बेपत्ता आहे. सहा कामगार जखमी झाले आहेत, त्यांच्यावर बोईसर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.कारखान्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.स्फोटाच्या आवाजाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला आहे. 

कामगारांची नावे... १) मिथिलेश राजवंशी (मृत)२) छोटे लाल सरोज (बेपत्ता कामगार)३) गणेश विजय पाटील (जखमी) ४) अरविंद यादव (जखमी ) ५) मुरली गौतम (जखमी) ६) अमित यादव (जखमी)७) मुकेश यादव (जखमी) ८) उमेश राजवंशी (जखमी)

टॅग्स :palgharपालघर