शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कारासह ‘लोकमत’कडून चार कार्यक्रम स्थगित; ‘कोरोना’मुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 06:35 IST

सामाजिक जबाबदारीतून उचलले पाऊल

नागपूर : जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’चा शिरकाव महाराष्ट्रातदेखील झाला आहे. या परिस्थितीत सामाजिक भान जपत ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने राज्यातील विविध शहरांमध्ये आयोजित चार मोठे कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात नागपूर येथे आयोजित सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचादेखील समावेश आहे, अशी माहिती ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन विजय दर्डा यांनी दिली.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे १४ मार्च रोजी ‘आयकॉन्स आॅफ कोल्हापूर’ या ‘कॉफीटेबल बुक’चे प्रकाशन आयोजित करण्यात आले होते. येथे ४०० हून अधिक मान्यवर व नागरिकांची उपस्थिती अपेक्षित होती. त्याच दिवशी सायंकाळी पुणे शहरात ‘लोकमत पुणे पोलीस अ‍ॅवॉर्ड’चे वितरण होणार होते. पोलिसांशी निगडित कार्यक्रम असल्याने यात तर १० हजारांची गर्दी होण्याची शक्यता होती.२२ मार्च रोजी यवतमाळ येथे ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापक, संगीतसाधक व माझी धर्मपत्नी श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिदिवसाच्या पूर्वसंध्येला ‘स्वरांजली’ या संगीतमय श्रद्धांजली स्वरसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. तर २३ मार्च रोजी ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ या भव्य कार्यक्रमाचे नागपुरात आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे १० हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती निश्चित मानली जात होती. हे सर्व कार्यक्रम तूर्तास स्थगित केल्याचे दर्डा यांनी सांगितले.नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाचीमुंबई, पुणे, नागपूरमध्ये ‘कोरोना’चे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळले पाहिजे. शिवाय जास्त नागरिक एकत्र होतील असे आयोजनदेखील स्थगित करावे किंवा पुढे ढकलावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. ‘लोकमत’ समाजाच्या सुखदु:खात नेहमीच सहभागी झाला आहे व वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांसमवेत उभा ठाकला आहे. राज्यातील नागरिक, आमचे मान्यवर पाहुणे, स्पर्धक , विजेते तसेच वक्ते व कलाकार यांची सुरक्षा व आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. एक जबाबदार वृत्तपत्र म्हणून आम्ही हे सर्व कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कोरोना’चा प्रभाव सरल्यानंतर आम्ही नवीन तारखांची घोषणा करू, असे विजय दर्डा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :LokmatलोकमतVijay Dardaविजय दर्डा