शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांकडून चार दिवस सामूहिक बलात्कार

By admin | Updated: July 22, 2016 22:44 IST

शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सतत चार दिवस सामूहिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेतील दोघांना पोलिसांनी

फूस लावून पळविले : दोघांना अटक, तीन जण फरार

गोंदिया, दि. 22 -  शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सतत चार दिवस सामूहिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून तीन जण फरार झाले आहेत. शहरातील वसंतनगर भागातील पीडित मुलगी एक आठवड्यापासून आपल्या घरातून निघून गेली होती.

दि.१७ रोजी गोंदिया रेल्वे स्थानकावरून आरोपी कलीम खान रफिक खान (२२, रा.आंबाटोली), मुकेश देवीदास मेश्राम (३४, रा.रामनगर) यांनी फूस लावून तिला सूर्याटोला येथे नेले. त्यानंतर तेथून शहरातील कुंभारेनगर परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यात छोटू उर्फ प्रशांत मोटघरे (२४), लाला उर्फ मितेश रामदास ब्राम्हणकर (२३, रा.सुंदरनगर) आणि आणखी एका आरोपीचा समावेश आहे. दि.१७ ते २० असे चार दिवस तिच्यावर अत्याचार झाले. तेथून ती कशीबशी सुटून गुरूवारी (दि.२१) ती गोंदिया रेल्वे स्थानकावर आली.

मात्र घाबरलेल्या पीडित मुलीने कुठेही तक्रार दिली नाही. तिच्याकडे प्लॅटफार्म तिकीट नसल्याने रेल्वे पोलिसांनी तिला पकडले. याबाबत मुलीच्या मामाच्या मुलाला माहिती मिळाल्यानंतर तो रेल्वे पोलिसांत आला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी दुपारी २.३० वाजता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.

याप्रकरणी भादंवि कलम ३७६ (ड, इ), ३४३, ३६६ (अ), ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी यातील कलीम खान व मुकेश मेश्राम या दोघांना अटक केली असून मितेश ब्राम्हणकर, प्रशांत मोटघरे व तिसरा आरोपी फरार आहेत.पोलिसांची लपवाछपवी...विशेष म्हणजे या प्रकाराची पहिली तक्रार गोंदिया रेल्वे पोलिसांकडे प्राप्त झाली. मात्र त्यांनी या प्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ केली. आम्हाला माहिती देण्याचे अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी शेवटपर्यंत माहिती दिली नाही. त्यामुळे पोलीस हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.