ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. १ - अमरावती जिल्ह्यातील झोलंबा गावात एकाच कुटुंबातील चार लहान मुलांचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनाघडली आहे. या घटनेत आणखी एका लहान मुलीची प्रकृती खालावली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
झोलंबा गावात एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे नुकतेच निधन झाले होते. या मृत व्यक्तीच्या तिस-याचे कार्य असल्याने घरात नातेवाईक आले होते. तिस-याचे जेवण झाल्यावर घरातील लहान मुलांना त्रास सुरु झाला. यातील चौघा मुलांचा मृत्यू झाला तर तीन वर्षाच्या एका मुलीची प्रकृती खालावली. विषबाधा नेमकी कशातून झाली याचा तपास सुरु आहे. मात्र एकाच कुटुंबातील चार लहान मुलांचा मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर सुरु कोसळला आहे.