शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते शिवसंग्राममध्ये

By admin | Updated: May 30, 2017 04:31 IST

माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते यांनी सोमवारी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते यांनी सोमवारी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला. रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या मोहिते यांच्याकडे शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषद या नव्या राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मोहिते यांनी शिवसंग्राममध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही शिवसंग्रामचा झेंडा हाती घेतला. शिवसेनेतून दोन वेळा खासदार व अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मोहिते यांनी काम केले आहे. २०१०मध्ये त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत, काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षही होते. मात्र क्षमता, अजेंडा असतानाही काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली जात नाही, असे त्यांनी सांगितले.देशभरातील नेते, कार्यकर्ते सध्या भाजपा प्रवेशासाठी उत्सुक असतात. मात्र, मोहिते यांनी राष्ट्रीय पक्षाला बाजूला सारून शिवसंग्राममध्ये प्रवेश केल्याने पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केला. तर काँग्रेसच्या धोरणामुळे राजकारणातील सहा वर्षे वाया गेली. सहा महिन्यांत शिवसंग्राम संघटनेला मजबूत करण्यास प्राधान्य देणार असून, ‘गाव तिथे शिवसंग्राम’ अशी मोहीम हाती घेणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.