शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

"राजू शेट्टी हा शेतकऱ्यांनी सोडून दिलेला रेडा"; सदाभाऊ भडकले, शेट्टींनीही सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 16:19 IST

सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर जहरी टीका; एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये जुंपली

मुंबई/इस्लामपूर: दूध दरवाढीच्या मुद्यावरून आज राज्यभरात भाजपाकडून आंदोलन सुरू आहे. एकीकडे भाजपाचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाल्याची जहरी टीका खोत यांनी केली आहे. खोत यांच्या टीकेला शेट्टी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनात शेतकरीच न दिसल्यानं सदाभाऊ खोत भ्रमिष्ट झाल्याचा पलटवार शेट्टी यांनी केला आहे.राजू शेट्टी भ्रमिष्ट झाल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरसंधान साधलं. राजू शेट्टी भंपक माणूस आहे. राजू शेट्टीचा आता काजू शेट्टी झाला आहे. हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे. प्रत्येक गावात देवाच्या नावानं एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा रेडा आहे. त्याला शेतकऱ्यांनी सोडून दिलंय. हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे, अशा शब्दांमध्ये खोत यांनी शेट्टींवर घणाघाती टीका केली. सदाभाऊ खोत दोन वेळा खासदार करायला त्या रेड्याबरोबर होता. तेव्हा दोन्ही हातांनी सदाभाऊचा गजर सुरू होता. तेव्हा सदाभाऊ चालत होता. पण आता त्यांना सत्ता मिळाली नाही, केंद्रात मंत्रिपदही मिळालं नाही. पण त्यांच्या सहकाऱ्याला मंत्रिपद मिळालं. त्यामुळे लगेच पोटात गोळा आला, अशा शब्दांत खोत यांनी शरसंधान साधलं. आता आंदोलन कशासाठी करता? तुम्हीच सरकारमध्ये आहात. तुम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे. मग द्या ना शेतकऱ्याला न्याय मिळवून. आंदोलनाची नाटकं कशासाठी करता?, असा सवाल खोत यांनी उपस्थित केला.राजू शेट्टी माझ्यावर आरोप करतात. या देशात न्यायव्यवस्था आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात जावं. सदाभाऊनं त्यांच्यासारख्या ३००-४०० एकर जमिनी घेऊन ठेवलेल्या नाहीत. सरकारला आंदोलनाची भीती दाखवून सहकाऱ्यांना पेट्रोल पंप, संस्था काढलेल्या नाहीत, अशी टीका खोत यांनी केली. खोत यांच्या टीकेला उत्तर देताना राजू शेट्टींनी दूधदरवाढीच्या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचं म्हटलं. भाजपाच्या आजच्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. त्यांच्या आंदोलनात शेतकरी कुठेच दिसला नाही. त्यामुळे आता सदाभाऊ खोत भ्रमिष्टासारखे आरोप करत आहेत, असा पलटवार शेट्टींनी केला. तुमचं आंदोलन कोणाविरुद्ध आहे? राज्य सरकारविरुद्ध, राजू शेट्टीविरुद्ध की केंद्राविरुद्ध?, असा सवाल शेट्टींनी विचारला.दूध प्रश्नावर आंदोलन करता. पण दुधाला दर मिळवून देणं राहिलं बाजूला. हे राजू शेट्टींवरच टीका करत बसले आहेत. आंदोलनाला अपेक्षित यश न मिळाल्याचं खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत शेट्टींनी खोत यांना प्रत्युत्तर दिलं. माझ्या नावे ३००-४०० एकर जमीन सापडली, तर तिची विक्री करूया. त्यातून आलेले पैस कडकनाथ कोंबडीत ज्यांचे पैसे बुडाले त्यांना देऊया, असा टोला शेट्टींनी लगावला.राजू शेट्टी हे तर सरकारी आंदोलक, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीकाVIDEO: मोठी दुर्घटना; आंध्र प्रदेशातील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळून ११ मजुरांचा मृत्यू

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत