शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौर भिकशेठ पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:57 IST

सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी महापौर भिकशेठ ज्ञानदेव पाटील (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे  निधन झाले. पुरोगामी विचारांची मशाल खांद्यावर घेऊन फुले - राजर्षी शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या कार्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.

ठळक मुद्देमाजी महापौर भिकशेठ पाटील यांचे निधनसामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते

कोल्हापूर : सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी महापौर भिकशेठ ज्ञानदेव पाटील (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे  निधन झाले. पुरोगामी विचारांची मशाल खांद्यावर घेऊन फुले - राजर्षी शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या कार्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.गेल्या दोन अडीच महिन्यांपासून भिकशेठ पाटील आजारी होते. त्यांच्या किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे रक्तात संसर्ग झाला होता. रक्तातील पांढऱ्या पेशीही कमी झाल्या होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर बनली. येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले.सन १९९१ मध्ये कोल्हापूरचेमहापौरपद भूषविण्याचा तसेच १९८५ ते १९९५ अशी सलग दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम करण्याचा बहुमान भिकशेट पाटील यांना मिळाला; परंतु त्यांचा मूळ पिंड हा राजकारणी यापेक्षा सामाजिक कार्यकर्ता असाच होता. त्याही पुढे जाऊन समाजप्रबोधन हाच त्यांचा ध्यास होता. त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता. ऐन तारुण्यात त्यांनी या थोर पुरुषांच्या विचारांना अनुसरूनच आपल्या कार्याला सुरुवात केली.सुरुवातीची काही वर्षे त्यांनी पत्रकारिता केली. विविध दैनिकांतून त्यांनी वार्ताहर ते उपसंपादकपदाची जबाबदारी सांभाळून उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारली. अत्यंत संवेदनशील मनाच्या पाटील यांनी जेथे अन्याय होतो तेथे संबंधित घटकांना न्याय मिळवून देण्यात पुढाकार घेतला. विधायक संस्था आणि व्यक्ती यांच्यावर त्यांनी सातत्यपूर्ण मौलिक आणि दर्जेदार लेखन केले.‘कोल्हापूरची मोठी माणसं’, ‘समतेचे धारकरी’, ‘लोकराजा शाहू छत्रपती’ ही प्रबोधन आणि प्रेरणादायी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. ‘कोल्हापूरची मोठी माणसं’ या पुस्तकाला माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी प्रस्तावना लिहिली. त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.पाटील हे अनेक संस्थांमध्ये कार्यरत होते. राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता प्रतिष्ठानचे ते उपाध्यक्ष होते. ‘लोकराजा राजर्षी शाहू’ ही दूरदर्शन मालिका व चित्रपट निर्मिती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. दूरदर्शन मालिका निर्मितीचे नियंत्रक या नात्याने त्यांनी तिथे अत्यंत जबाबदारीने काम केले. जिल्हा बालकल्याण संकुल येथे मानद कार्यवाह म्हणून त्यांनी केलेले कार्य त्यांची गरीब, अनाथ मुलांबद्दलची तळमळ सिद्ध करते.

राष्ट्रीय तालीम संघात त्यांनी सरचिटणीस म्हणून काम करून कुस्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. शाहू छत्रपती शिक्षण संस्था येथे संचालक, राष्ट्रीय विचार प्रबोधिनी, कोल्हापूर या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोल्हापूर जिल्हा वारांगणा पुनर्वसन संघ, जिल्हा व शहर झोपडपट्टी संघ यांतही पाटील आस्थेने कार्यरत राहिले. ‘समाजप्रबोधनाचा अखंड ध्यास घेऊन काम करणारा कार्यकर्ता’ हीच त्यांची खरी ओळख राहिली. 

 

टॅग्स :Mayorमहापौरkolhapurकोल्हापूर