शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी जमीन डीनोटिफाइड प्रकरणी माजी उद्योगमंत्री चव्हाण, कदम, दर्डा यांना क्लीन चिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:04 IST

औद्योगिक वापरासाठी अधिसूचित केलेली जमीन रद्द (डीनोटिफाइड) करू नये, असा लेखी अभिप्राय एमआयडीसी अधिकाऱ्यांनी, तसेच उद्योग विभागाने दिलेला असताना, तो डावलून विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी अधिसूचना रद्द करण्याची कारवाई केली, असा स्पष्ट निष्कर्ष के. पी. बक्षी यांच्या समितीने काढला आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई  - औद्योगिक वापरासाठी अधिसूचित केलेली जमीन रद्द (डीनोटिफाइड) करू नये, असा लेखी अभिप्राय एमआयडीसी अधिकाऱ्यांनी, तसेच उद्योग विभागाने दिलेला असताना, तो डावलून विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी अधिसूचना रद्द करण्याची कारवाई केली, असा स्पष्ट निष्कर्ष के. पी. बक्षी यांच्या समितीने काढला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन उद्योगमंत्री पतंगराव कदम, अशोक चव्हाण आणि राजेंद्र दर्डा यांनी प्रचलित नियम डावलून एक एकरही जमीन डीनोटिफाइड केलेली नाही, असा स्पष्ट निर्वाळाही या समितीने दिला आहे. समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे.नाशिक जिल्ह्यातील ज्या जागा डीनोटिफाइड केल्या, त्याचा फायदा तेथील बिल्डरला मोठ्या प्रमाणात झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्यावरून विधिमंडळात प्रचंड गदारोळही झाला. देसार्इंच्या चौकशीची मागणी झाली, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी जाहीर करताना, मागील १५ वर्षांतील डीनोटिफाइड केलेल्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांची समिती नेमली होती.काँग्रेस-राष्टÑवादीच्या सरकारमधील नारायण राणे, अशोक चव्हाण, पतंगराव कदम आणि राजेंद्र दर्डा या तत्कालीन उद्योगमंत्र्यांच्या कार्यकाळात किती जमिनी डीनोटिफाइड करण्याची कारवाईझाली, याचीही चौकशी बक्षी समितीने केली. त्यात चव्हाण, कदम आणिदर्डा या तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी नियम डावलून एक एकरही जमीन डीनोटिफाइड केलेली नाही, असे आपल्या अहवालात नमूद केल्याचे बक्षी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आॅगस्ट २००२ ते आॅगस्ट २०१७ या काळात १६० प्रकरणांमध्ये ३१,१४५ हेक्टर जमीन ‘डीनोटिफाइड’ केली गेली. त्यापैकी जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१७ या काळातील विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ४० प्रकरणांमध्ये उद्योग विभागाचे म्हणणे डावलून, जमीन डीनोटिफाइड केल्याचा, तर नारायण राणे यांनी ५५ प्रकरणांमध्ये जमीन डीनोटिफाइड केल्याचा ठपका बक्षी समितीने ठेवला आहे.जमीन अधिसूचित करणे किंवा ती अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला प्राप्त होतो आणि तो प्रस्ताव उद्योग विभागामार्फत उद्योगमंत्र्यांकडे येतो. या नियमानुसार काम करताना अधिकाºयांनी किंवा सचिवांनी निदर्शनास आणून दिलेल्या गोष्टी डावलून काम करताना जर मतभिन्नता आली असेल, तर असे प्रकार मुख्यमंत्र्यांकडे न्यावे लागतात. मात्र, १६० डीनोटिफाइड प्रकरणांपैकी मतभिन्नता असणाºया ९५ प्रकरणांची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली नव्हती.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ४० प्रकरणांमध्ये, तर नारायण राणे यांनी ५५ प्रकरणांमध्ये उद्योग सचिवांचे म्हणणे डावलून जमीन डीनोटिफाइड केल्याचे समितीला आढळून आले आहे.अशोक चव्हाण, पतंगराव कदम आणि राजेंद्र दर्डा या तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी अधिकाºयांनीकेलेल्या शिफारशींनुसारच जमीन डीनोटिफाइड केली, असे समितीने अहवालात म्हटले आहे.के. पी. बक्षी समितीची महत्त्वाची सूचनाजमीन नोटिफाइड केल्यानंतर, ती ३५ वर्र्षांऐवजी १५ वर्षांच्या आत एमआयडीसीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी व १५ वर्षे कधी पूर्ण होणार, ती तारीखही राजपत्रात नमूद करावी; जेणेकरून शेतकºयांना तारखेचा हिशेब लावत बसण्याची वेळ येऊ नये, असा अभिप्राय बक्षी यांनी चौकशी अहवालात नोंदविला आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार