शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

भूल देऊन केली गायींची चोरी

By admin | Updated: February 12, 2017 02:04 IST

वसई तालुक्याच्या ग्रामीण भागातून गायींना बेशुद्ध करून चोरून नेण्याचा प्रकार उघड झाला. अशा रीतीने गायी चोरणारी टोळी या भागात सक्रिय झाल्याचेही समजते आहे.

- सुनील घरत, पारोळ

वसई तालुक्याच्या ग्रामीण भागातून गायींना बेशुद्ध करून चोरून नेण्याचा प्रकार उघड झाला. अशा रीतीने गायी चोरणारी टोळी या भागात सक्रिय झाल्याचेही समजते आहे. या परिसरातील गुरांचे मालक हादरले असून, परिसरातील गावागावांत संतापाची लाट उसळली आहे.गोवंश हत्या बंदीनंतर गोवंशाची तस्करी सुरू झाली आहे. महामार्गालगत असलेल्या निर्जन भागात अनेक जण आपल्या गायी व बैल, म्हशी चरायला मोकाट सोडतात. अनेकदा ती गुरे गोठ्यात परतत नाही. अशा वेळी त्यांच्या मागावर असलेले चोरटे त्यांना बेशुद्ध करणारे इंजेक्शन देतात व ट्रकमध्ये टाकून त्यांची कत्तल करतात, असे अनेक प्रकार मागे उजेडात आले होते. या वेळी अशा तस्करांना पकडून पोलिसांच्या हवालीही करण्यात आले होते. मात्र आता तस्करांनी एअर गनने डागता येणारे इंजेक्शन मारून गायी चोरण्याचे तंत्र अवलंबले आहे. हे तंत्र बिबळ्यासारख्या हिंस्त्र श्वापदांना पकडण्यासाठी वापरले जाते. त्याचाच वापर हे चोरटे करीत आहेत. खानिवडे गावातील नवनीत पब्लिकेशन कंपनीच्या परिसरातील जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या पाठीमागील गेटजवळ कळपाने राहणाऱ्या गायींना इंजेक्शन मारून बेशुद्ध करत पळवण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र हा भाग महामार्गापासून लांब असल्याने व खानिवडे हनुमान नगर पाड्याच्या पाठीमागे नेमक्या वेळी कोणाची तरी चाहूल लागल्याने इंजेक्शन मारलेल्या काही गायींना तेथेच सोडून तस्कर पळून गेले. या गावात दररोज पहाटे रानात ट्रेक करणाऱ्या ग्रुपला सकाळी ६च्या सुमारास एक काळी कपिला गाय लडखडत चालत असलेली दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर गायीच्या डाव्या बाजूच्या पायाच्या वरच्या भागाला कुठल्याशा साधनाने दुरूनच टोचता येणारे एक इंजेक्शन अर्धे औषध भरलेल्या स्थितीत लटकल्याचे आढळून आले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.