शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सापाला दोनदा भूल, दोन तास आॅपरेशन अन् दहा टाके...

By admin | Updated: June 14, 2016 02:59 IST

छोट्या प्लॅस्टिकच्या डबीत अडकून जखमी झालेल्या धामण जातीच्या सापावर सोमवारी नाशिकमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डबीत साप अडकण्याची प्राणिजगतातील

नाशिक : छोट्या प्लॅस्टिकच्या डबीत अडकून जखमी झालेल्या धामण जातीच्या सापावर सोमवारी नाशिकमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डबीत साप अडकण्याची प्राणिजगतातील ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. एका सर्पमित्राने सापाला पशुवैद्यकीय दवाखान्यात आणल्यानंतर त्याच्यावर दोन तास शस्त्रक्रिया करून डबी काढण्यात आली. सापाला दोनदा भूल द्यावी लागली, तसेच १० टाकेही घालावे लागले. नाशिकजवळच्या विल्होळी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीत धामण जातीचा बिनविषारी साप आढळून आला. तो एका छोट्या प्लॅस्टिकच्या डबीत अडकला होता. त्वचा काचली गेल्याने खोलवर जखम झाली होती. हे पाहून नाशिकरोड येथील सर्पमित्र अनंत वाळे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी २५ ते ३० फूट खोल विहिरीत दोरी व शिडीच्या साहाय्याने उतरून सापाला बाहेर काढले. वाळे यांनी सापाला तातडीने अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांनी या सापावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेसाठी सापाला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. शरीरात अडकलेली डबी कापून बाजूला काढण्यात आली. जखम स्वच्छ करण्यात आली व दहा टाके घालण्यात आले. मधल्या काळात सापाची थोडी हालचाल जाणवू लागताच पुन्हा भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. या सगळ्या प्रक्रियेला दीड ते दोन तासाचा कालावधी लागला. मंगळवारी त्याचे बॅँडेज बदलले जाईल. सुमारे दीड महिने त्याची देखभाल केल्यानंतरच तो पूर्वस्थितीत येणार आहे. तोपर्यंत त्याला सर्पमित्र मनीष गोडबोले यांच्याकडे ठेवले जाणार आहे. (्प्रतिनिधी)अशा प्रकारे डबीत साप अडकण्याची घटना अत्यंत दुर्मीळ आहे. हृदयापासून दीड इंच खाली ही डबी घट्ट रुतून बसली होती. एवढ्या दीर्घकाळ शस्त्रक्रिया होऊन दोनदा भूल द्यावी लागण्याची बाबही दुर्मीळ असून, राज्यात अशा खूप कमी घटना घडल्याचे सांगितले जाते.