शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माजी पीएला मारहाण, व्हिडिओ व्हायरल, मारणारी व्यक्ती म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 01:09 IST

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोपावरून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्विय सहाय्यक अजय धवणे यांना एक  व्यक्तीने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

चंद्रपूर -  नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोपावरून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्विय सहाय्यक अजय धवणे यांना एक  व्यक्तीने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती अजय धवने यांना लाथाबुक्यांनी मारहाण करताना दिसत आहे. मात्र संबंधित मारहाण करणारी व्यक्ती आता समोर आली असून, त्यांनी हा व्हिडीओ सव्वा वर्षापूर्वीचा असल्याचे सांगितले आहे. तसेच हा जुना व्हिडीओ राजकीय हेतूने व्हायरल केल्याचा दावा केला आहे.  

अजय धवने यांनी मारहाण करत असलेल्या पीडिताकडून नोकरी लावून देण्याच्या नावाखाली  13 लाख रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अजय  धवने यांनी नोकरी लावण्याच्या नावावर एक लाखापासून तीस लाखापर्यंत पैसे उकळल्याची चर्चा सुरू आहेत. दरम्यान, धवने यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्या व्यक्तीने स्पष्टीकरण दिले आहे. या व्यक्तीचं नाव रामजी हरणे असं आहे. त्यांनी सांगितलं की, मी एक  महत्त्वाचं आवाहन करण्यासाठी समोर आलो आहे. गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये मी अजय धवने नावाच्या व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ ऑक्टोबर २०२१ मधील आहे. अजय घवने या व्यक्तीला मी काही कारणास्तव पैसे  दिले होते. ते पैसे परत करण्यास त्यांनी विलंब केला. त्यामुळे माझ्या हातून ती घटना घडली होती. हे मी मान्य करतो. त्याबाबत मी त्यांची माफी मागितली होती. तसेत पेैसे परत केले होते. मात्र आता काही राजनीतिक छडयंत्रकारी हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. त्यांचा हेतू काय आहे हे त्यांनाच माहिती,  असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान , अजय धवने यांचा राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाशी काहीही संबंध नसून धवने याला  दिनांक ३१-०१-२०२२ रोजी श्री मुनगंटीवार यांनी  निष्कासीत केले आहे. त्यामुळे सदर व्यवहाराशी  संबंध जोडणे अप्रस्तुत आहे अशी प्रतिक्रिया  सुधीर मुनगंटीवार यांच्या  जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार