शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्री विचारतात, या वाघांना कसे आवरायचे हो?; राज्यातील वाघांची संख्या ३५० पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 10:03 IST

२७ राज्यांना साकडे, वाढती वाघांची संख्या पाहता त्यांचा मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे.

मनोज मोघेमुंबई : वाघ आणि मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षात आतापर्यंत ७७ जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे रोखण्यासाठी अतिरिक्त वाघांना गुजरात किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याचा सरकारचा विचार आहे. याआधीची उपाययोजना म्हणून वाघ आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाय सुचवा, असे पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २७ राज्यांच्या वन व पर्यावरणमंत्र्यांना लिहिले आहे.

व्याघ्रप्रकल्पांतील वाघांची संख्या (२०१८) ताडोबा - ८३, चंद्रपूर - ३१, बह्मपुरी - ३९, चांदा - २३, मेळघाट - ४६, पेंच - ५३, बोर - ६, उमरेड-पवनी-कऱ्हांडला - ११, नवेगाव-नागझिरा - ६, टिपेश्वर - ५, पैनगंगा - १, सह्याद्री - ३

काय म्हणतात वनमंत्री? वाढती वाघांची संख्या पाहता त्यांचा मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. ‘डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन योजना’ याचसाठी लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत जंगलांशेजारी वसलेल्या गावांचे वनांवर अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही गावांचे स्थलांतरही करण्यात आले आहे. त्याचे काही चांगले परिणाम दिसून आले आहेत. अशा प्रकारच्या आणखी कोणत्या योजना आपल्या राज्यांत राबविल्या जातात याची माहिती द्यावी, अशी विनंती वनमंत्र्यांनी अन्य राज्यांकडे केली आहे. 

यामुळे वाढली वाघांची संख्या समृद्ध जंगलांची व्याख्या ही तेथील वाघांच्या संख्येवरून केली जाते. या रुबाबदार प्राण्याचे संवर्धन व्हावे म्हणून महाराष्ट्राने विविध उपाययोजना केल्या. परिणामी राज्यातील वाघांची संख्या ३५० पार पोहोचली आहे. वनांची मर्यादित संख्या आणि वाढणारी वाघांची संख्या याचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जात असल्याची बाब मुनगंटीवार यांनी सर्व राज्यांच्या वन व पर्यावरणमंत्र्यांच्या निदर्शनास आणली आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघ