शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

ठार केलेल्या वाघावरुन वन विभागच संभ्रमात

By admin | Updated: August 24, 2014 01:07 IST

१९ आॅगस्टला गोळ्या घालून ठार मारलेला वाघ नरभक्षीच होता का? यावरून वनविभागाचा पुरता गोंधळ उडाला आहे. वन विभागाचे अधिकारी वाघाला ठार मारण्याचे समर्थन करीत आहेत.

गोंधळात भर : अधिकारी व वनमंत्र्यांचे परस्परविरोधी वक्तव्यचंद्रपूर : १९ आॅगस्टला गोळ्या घालून ठार मारलेला वाघ नरभक्षीच होता का? यावरून वनविभागाचा पुरता गोंधळ उडाला आहे. वन विभागाचे अधिकारी वाघाला ठार मारण्याचे समर्थन करीत आहेत. तर खुद्द याच खात्याच्या मंत्र्यांनी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘वाघाला ठार मारणे हा एक अपघात होता’, असे वक्तव्य केल्याने संशय वाढला आहे. चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वन संरक्षक संजय ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन वनविभागाची बाजू मांडली होती. त्यात त्यांनी वाघाला ठार करण्याच्या कृतीचे समर्थन करीत पोंभूर्णा तालुक्यात घडलेल्या सातपैकी सहा घटनांमध्ये माणसांना मारणारा वाघ एकच होता, असा दावा केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी पुराव्यादाखल घटनास्थळावरील छायाचित्रे आणि व्हिडीओ फुटेजही सादर केले होते. वन अधिकारी आपली बाजू मांडत असताना सांगलीतील पत्रकार परिषदेत वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी संबंधित वाघ नरभक्षी होता किंवा नाही हे अस्पष्ट असल्याचे सांगितले आहे. वाघाला नरभक्षक ठरवून गोळ्या घालणे हा अपघात होता. नेमबाजांनी केवळ स्वत:च्या सुरक्षेसाठी वाघावर गोळीबार केला, असे वक्तव्य त्यांनी केल्याने या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वनविभागात अधिकारी आणि मंत्रीस्तरावर हा गोंधळ सुरु असताना वाघाला ठार करण्याच्या कृतीवरून जिल्ह्यातही बरीच ओरड सुरू आहे. १९ तारखेच्या सायंकाळी ठार करण्यात आलेला वाघ आणि सातही व्यक्तींना मारणारा वाघ एकच आहे, असा दावा वनविभाग करीत असला तरी परिसरातील जनता आणि वन्यजीवप्रेमी यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. हल्ल्याच्या सातपैकी पाच घटना वन विकास महामंडळाच्या हद्दीत तर दोन घटना प्रादेशिक वनविभागाच्या क्षेत्रात घडल्या आहेत. वनविकास महामंडळाचे अधिकारीही आपल्या क्षेत्रात हल्ले करणारा हा वाघ नव्हे असे खाजगीत म्हणत आहेत. भटारी, देवई, बेरडी, पोंभूर्णा आदी गावातील गावकऱ्यांनी हल्ल्यानंतर वाघाला पाहिले आहे. ते सुद्धा मारलेला वाघ हल्लेखोर नव्हे, असे सांगत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)पगमार्कवरूनही संशयाचे वातावरण ठार करण्यात आलेल्या वाघाचे पगमार्क व हल्ल्याच्या दिवशी घेतलेल्या वाघाचे पगमार्क एकमेकांसोबत जुळत नसल्याचीही माहिती आहे. वाघाची ओळख पटविण्यात पगमार्क महत्वाचे मानले जातात. मात्र वनविकास महामंडळ आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये यावरून मतभेद दिसत आहेत. अलीकडच्या काळात पगमार्क हा पुरावा महत्वाचा नसून अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने मिळविलेल्या माहितीचा आधार महत्त्वाचा समजला जातो, असे सांगत संजय ठाकरे यांनी पगमार्कऐवजी छायाचित्रांच्या पुराव्यावर अधिक भर दिला आहे. मात्र मारलेला वाघ वनविकास महामंडळाच्या हद्दीतील नसल्याची खाजगी चर्चा महामंडळाचेच अधिकारी करीत असल्याने संभम्र पसरला आहे. वनजीव प्रेमींनीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.