शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

फणसाड अभयारण्यातील रेस्टॉरंटमध्ये परदेशी पाहुणे मारताहेत ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 07:54 IST

गिधाडांच्या संवर्धनासाठी फणसाड अभयारण्यात वनविभागाने गेल्या वर्षी उभारलेला ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे.

राजीव नेवासेकर

बोर्ली-मांडला :

गिधाडांच्या संवर्धनासाठी फणसाड अभयारण्यात वनविभागाने गेल्या वर्षी उभारलेला ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. येथे मेजवानीसाठी परिसरातील गिधाडे येतात. विशेष म्हणजे, या ठिकाणी गेल्या आठवड्यात इजिप्शियन सोनेरी रंगाची, काळ्या मानेची गिधाडे वनाधिकाऱ्यांना दिसली. 

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच थंडीची चाहूल लागताच खाडी व समुद्रकिनारी स्थलांतरित परदेशी पक्षी येतात. फणसाड अभयारण्यात प्रथमच हे परदेशी गिधाड दिसले. गेल्यावर्षी सुपेगाव परिसरातील फणसाड वन्यजीव संरक्षक अभयारण्यात व्हल्चर रेस्टॉरंट उभारले.  या रेस्टॉरंटमध्ये येथील वनाधिकारी व वनरक्षक मुरूड तालुक्यासह अन्य परिसरातील मृत जनावरांना आणून टाकतात. हे गिधाडांचे प्रमुख अन्न आहे. ते खाण्यासाठी या परिसरातील गिधाडे आता येत आहेत; परंतु, आता त्यात परदेशी पाहुणेही येत आहेत. वनविभागाने या रेस्टॉरंटमध्ये दोन दिवसांपूर्वी इजिप्शियन सोनेरी गिधाडे ताव मारताना वन अधिकाऱ्यांना दिसली. सहायक वनसंरक्षक नंदकिशोर कुप्ते यांनी दुजोरा दिला.

सामाजिक संस्थांचाही मदतीचा हात    फणसाड अभयारण्यातील वनसंपदा व पशु-पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था मदत करीत असून, ग्रीन वर्क ट्रस्ट ही एक संस्थादेखील गिधाड प्रजातीच्या रक्षण व संवर्धनासाठी येथे काम करीत आहे. त्यामुळे येथे नष्ट होत चाललेल्या गिधाडांच्या संख्येत वाढ होत आहे.     आता तर परदेशी गिधाडे ही फणसाड अभयारण्यात घिरट्या घालू लागली आहेत. 

1. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे शेती क्षेत्र घटले आहे. तसेच आधुनिक यंत्रसामग्रीचा शेतीत वापर वाढल्याने शेतकरी जनावरे अर्थात गाई-म्हशी पाळण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने घटले आहे. 2. जनावरांचे मांस हे गिधाडांचे अन्न. तेच कमी होत असल्याने गिधाडांचे  प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन ही गरज बनली. याच हेतूने वनविभागाने येथील फणसाड अभयारण्यात व्हल्चर रेस्टॉरंट ही संकल्पना राबवली आहे.