शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी ड्रग्ज तस्करांचे आता प्रत्यार्पण करणार : मुख्यमंत्री; किरकोळ गुन्हे माफ करून प्रत्यार्पणासाठी कार्यपद्धती ठरविणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:41 IST

शिंदेसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरामधील एक शालेय विद्यार्थिनी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे प्रकरण उपस्थित करत शहरात अमली पदार्थाचा वापर वाढत असल्याबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रत्यार्पणाची कारवाई टाळण्यासाठी नायजेरियासह काही देशांमधील ड्रगतस्कर हे किरकोळ गुन्हे करतात असे ध्यानात आले आहे. म्हणून हे किरकोळ गुन्हे माफ करून त्यांचे लगेच प्रत्यार्पण केले जाईल, त्यासाठीची कार्यपद्धती राज्य सरकार ठरवत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

शिंदेसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरामधील एक शालेय विद्यार्थिनी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे प्रकरण उपस्थित करत शहरात अमली पदार्थाचा वापर वाढत असल्याबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले. या उत्तरात त्यांनी  सांगितले की, संबंधित मुलीचा ताबा तिच्या आईकडे देऊन तिचे समुपदेशन केल्याचे आणि शहरातील अमली पदार्थविरोधी अभियानाची माहिती दिली. 

उद्धवसेनेचे वरुण सरदेसाई यांनी आपल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात अंमली पदार्थांची तस्करी, व्यापार वाढत असल्याचे आणि दाट लोकवस्त्यांमध्ये पोलीस या प्रकरणी कारवाईदेखील करत नसल्याचे म्हटले.    

प्रत्येक जिल्ह्यात समित्या छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२४ मध्ये अमली पदार्थ विक्री प्रकरणी १४५ गुन्हे दाखल झाले. यात २४३ आरोपी होते. ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालूवर्षी जूनअखेर २२५ गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींची संख्या २४७ इतकी होती आणि त्यांच्याकडून २ कोटी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्यात अंमली पदार्थांचा व्यापार व तस्करी रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विविध विभागांच्या समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

बाल गुन्हेगारांचे वय कमी करण्याचा प्रस्तावड्रग तस्कर हे बालकांचा वापर गुन्ह्यांसाठी करतात, त्यामुळे पोलिस कारवाईत अडचणी येतात असे वरुण सरदेसाई म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, बलात्काराच्या गुन्ह्यात जसे बालकांचे वय (सज्ञानतेचे) कमी करण्यात आले आहे तसेच ते ड्रग तस्करीच्या गुन्ह्यांबाबतही करण्याचे प्रस्तावित आहे

कारवाईसाठी केंद्र सरकारचीही परवानगीमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नायजेरियन आणि अन्य काही देशातील ड्रग्ज तस्कर वारंवार किरकोळ गुन्हे करतात. आपले प्रत्यार्पण करता येऊ नये असा त्यांचा उद्देश असतो. आता केंद्र सरकारने अशी परवानगी दिली आहे की असे किरकोळ गुन्हे असतील तर ते मागे घेऊन या तस्करांचे प्रत्यार्पण करता येऊ शकेल. त्यामुळे आता तशी कारवाई राज्य सरकार करेल.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ