शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी कंपन्यांची बुलेट ट्रेनसाठी रस्सीखेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 05:18 IST

देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे स्वप्न जपानच्या मदतीने प्रत्यक्षात आकारास येत आहे

महेश चेमटे मुंबई : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे स्वप्न जपानच्या मदतीने प्रत्यक्षात आकारास येत आहे. त्याचबरोबर, देशातील विविध शहरांतर्गत बुलेट ट्रेन यशस्वी होऊ शकेल का? याची चाचपणी करण्यासाठी विदेशी कंपन्या सरसावल्या आहेत. यात जर्मनी, फ्रान्स, आॅस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. विदेशी कंपन्यांची देशातील बुलेट प्रकल्प मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, मुंबई-पुणे-नागपूर मार्गावर बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षणाला बोर्डातर्फे हिरवा कंदील देण्यात आला आहे.रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, विकसनशील देशात बुलेट प्रकल्प सुरू करून, वर्षानुवर्षे नफा मिळविण्याच्या उद्देशाने जगभरातील बुलेट ट्रेन कंपन्या सज्ज आहे. यात जर्मनी, फ्रान्स आणि आॅस्ट्रेलिया येथील बुलेट ट्रेन कंपन्या आघाडीवर आहे. सध्या केवळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नव्या बुलेट ट्रेन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली नाही. तथापि, मुंबई-नागपूर, दिल्ली-वाराणसी, पुणे-नागपूर या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विदेशी कंपन्यांनी ‘आवश्यकता’ सर्वेक्षणाला बोर्डातर्फे मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या सर्व्हेला सुरुवात होणार आहे. सर्व्हेच्या अहवालानंतर याबुलेट ट्रेन प्रकल्पांवर योग्य निर्णय घेण्यात येईल.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ठाणे आणि साबरमती येथे प्रत्येकी एक कायमस्वरूपी डेपो उभारण्यात येणार आहे, तर बुलेट ट्रेनच्या चाचणीसाठी सुरत येथे तात्पुरत्या स्वरूपाचा डेपो उभारण्यात येणार आहे. हजार किलोमीटर चाचणी घेतल्यानंतर प्रत्यक्ष प्रवाशांसह बुलेट ट्रेन धावणार आहे. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अर्थात, १५ आॅगस्ट २०२२ ही डेडलाइन बुलेट ट्रेनसाठी निश्चित करण्यात आली आहे.जलद प्रवासासाठी नागरिक हवाई प्रवासाला प्राधान्य देतात. देशातील लोकसंख्येच्या तुलनेत ५ टक्क्यांहून कमी प्रवासी वाहतुकीसाठी हवाई मार्गाचा वापर करतात. सद्य:स्थितीत हवाई मार्गामुळे दोन ठिकाणांमधील अंतर काही तासांचे असते. मात्र, हे अंतर केवळ विमान उड्डाणाचे असते.विमानतळावरील चेक इन, बोर्डिंग, घरापासून विमानतळाला जाण्याचा वेळ या सर्वांचे एकूण वेळ आणि विमान उड्डाणाचा वेळ यांना एकत्रित केल्यास, सुमारे चार ते पाच तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. यामुळे बुलेट ट्रेन सुरू झाल्यास, प्रवाशांचा प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ वाचणार असल्याचे रेल्वे बोर्डातील अधिकारी सांगतात.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन