शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

फोर्डच्या कार, इंजिनसाठी भारत निर्यात हब

By admin | Updated: January 16, 2017 05:57 IST

भारताला जागतिक निर्यात तळ (निर्यात हब) बनविल्याची माहिती ‘एफआयपीएल’चे व्यवस्थापकीय संचालक (विपणन, विक्री व सेवा) अनुराग मेहरोत्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सोपान पांढरीपांडे,

नागपूर- आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी फोर्ड इंडिया प्रा. लि.ने (एफआयपीएल) कार आणि इंजिनसाठी भारताला जागतिक निर्यात तळ (निर्यात हब) बनविल्याची माहिती ‘एफआयपीएल’चे व्यवस्थापकीय संचालक (विपणन, विक्री व सेवा) अनुराग मेहरोत्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मेहरोत्रा म्हणाले, ‘फोर्डने कारच्या जोडणीसाठी दोन उत्पादन प्रकल्प आणि इंजिनच्या उत्पादनासाठी चेन्नईजवळ चेनगलपट्ट व गुजरातेतील सानंद येथे प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता ४.४० लाख कार आणि ६.४० लाख इंजिननिर्मितीची आहे. गेल्या वर्षी फोर्ड इंडियाने जवळपास २.४० लाख कारची निर्मिती केली. त्यापैकी १.५० लाख कार जगात ५०पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केल्या आहेत. देशांतर्गत बाजारात ८५ हजार कारची विक्री केली,’ असे मेहरोत्रा यांनी स्पष्ट केले. फोर्डचे दोन्ही प्रकल्प अद्ययावत असून, फोर्डचे संस्थापक हेन्री फोर्ड यांच्या जगात प्रसिद्ध असेम्ब्ली लाइन्स डिझाइननुसार उभारले आहेत. एका तासात ६० कार अर्थात, दर मिनिटाला एका कारची निर्मिती या प्रकल्पात होते.मेहारोत्रा म्हणाले, प्रत्येक श्रेणीत फोर्डची गाडी उपलब्ध आहे. हॅचबॅकमध्ये फिगो, मध्यम वर्गवारीत सेडन अ‍ॅस्पायर आणि स्पोर्ट युटिलिटीमध्ये इकोस्पोर्ट आणि इंडेव्हर कार आहेत. आमच्या महसुलात इकोस्पोर्टचा वाटा ५० टक्के आहे. फोर्ड इंडियाकडून एक ते पाच लीटर क्षमतेच्या इंजिनचे उत्पादन केले जाते व त्यात इंधन कार्यक्षमतेचा विकास व नियंत्रित कार्बन उत्सर्जनावर भर देण्यात येतो. त्यामुळे फोर्ड कार ग्राहकोपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. फोर्डची मस्टांग ही कार पाच लीटर, आठ सिलिंडर इंजिनची असून, कारची गती ताशी ३०० कि़मी. एवढी आहे. या कारची किंमत ६५ लाख आहे. भारतातील स्पोर्ट कारप्रेमींकडून मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.फोर्ड इंडिया महाराष्ट्रात युनिट स्थापन करणार आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात मेहरोत्रा म्हणाले, चेनगलपट्टू आणि सानंद येथील प्रकल्प आपल्या एकूण क्षमतेपेक्षा अर्ध्या क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे नवीन युनिट सुरू करण्याची शक्यता नाही. याशिवाय फोर्ड ओईएम सप्लायरचे या प्रकल्पांजवळ लहान युनिट्स आहेत. त्यामुळे नवीन ठिकाणी आम्ही का जाऊ, असा प्रतिसवाल त्यांनी केला. इथेनॉल इंजिनच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अमेरिका आणि चीनमध्ये दमदार पेट्रोल इंजिनला तर भारतात दोन लीटरपेक्षा कमी क्षमतेच्या इंधन इंजिनला प्राधान्य दिले जाते, पण सरकारने इंजिनवर स्पष्ट धोरण आणले, तर फोर्ड निश्चितच इथेनॉल इंजिनचा विचार करेल. केंद्र सरकार १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडणार आहे. यापासून आॅटोमोबाइल क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. प्राप्तिकराच्या टप्प्यात वाढ आणि दोन लीटरपेक्षा कमी इंजिनवरील उत्पादन शुल्कात घट केल्यास कारच्या विक्रीत निश्चितच वाढ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. फोर्ड इंडियाने फोर्डची मस्टांग ही आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आरामदायक स्पार्ट कार संपूर्ण बिल्ट युनिट प्रकारात (सीबीयू) आयात करण्यास सुरुवात केली. ही कार पाच लीटर, आठ सिलिंडर इंजिनची असून, कारची गती ताशी ३०० कि़मी. एवढी आहे. या कारची किंमत ६५ लाख आहे. भारतातील स्पोर्ट कारप्रेमींकडून मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.