मुंबई : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता वांद्रे येथील ३६, टर्नर रोड या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील कार्यालयाची जागा धमकी देऊन खाली करण्याचा प्रयत्न नितेश राणेंचे गुंड करत असल्याचा आरोप कार्यालयाच्या मालकाने केला आहे. स्टाइल आॅफ ब्रिलँन्टो टेक्सटाइल्स मिल्स प्रा.लि.चे कॉर्पोरेट आॅफिस वांद्रे येथील ३६, टर्नर रोड या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर आहे. दीड वर्षापूर्वी ही जागा रोहित कंधारी यांनी विकत घेतली आहे. मात्र नितेश राणेंचे नाव पुढे करीत काही गुंड त्यांना ही जागा रिकामी करण्यास जबरदस्ती करीत आहेत. जागा खाली न केल्यास भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी हे गुंड देत आहेत, असे कंधारी यांनी याचिकेत म्हटले आहे.याचिकेनुसार, नितेश राणेंचे कार्यालय याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. संबंधित इमारतीच्या विकासकाने नितेश राणे यांचे पैसे न दिल्याने ते वसूल करण्यासाठी राणेंचे गुंड कंधारी यांना जबरदस्तीने कार्यालय खाली करण्यास सांगत आहेत. ‘याबाबत वारंवार पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी केवळ दखलपात्र गुन्हा नोंदवला. एकदा तर पोलिसांसमोरच धमकीचा फोन आला. तो कॉल लाऊडस्पीकरवर ठेवून पोलिसांना संभाषण ऐकवण्यात आले; तरीही पोलिसांनी एफआयआर न नोंदवता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविण्याची सूचना केली. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे माझ्या जिवाला, कुुटुंबाच्या जिवाला आणि कार्यालयाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचे व पोलीस संरक्षण देण्याचा आदेश द्या,’ अशी विनंती कंधारी यांनी याचिकेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी) संरक्षणाबाबत अर्ज करान्या. के.के. तातेड यांनी याबाबत राज्य सरकारला ४ जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देत या याचिकेवरील पुढील सुनावणी ६ जानेवारी रोजी ठेवली आहे. तसेच याचिकाकर्त्याला पोलीस संरक्षणाबाबत अर्ज करण्यास सांगत पोलिसांना यावर तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
जबरदस्तीने कार्यालयाचा ताबा घेतल्याचा आरोप
By admin | Updated: December 31, 2016 03:10 IST