शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बुट पॉलिशमधून प्रवाशांची लूट!

By admin | Updated: March 1, 2017 01:56 IST

मध्य रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या बुट पॉलिशमधून प्रवाशांची सर्रासपणे लूट चालवली असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मध्य रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या बुट पॉलिशमधून प्रवाशांची सर्रासपणे लूट चालवली असल्याचे समोर आले आहे. क्रीम बुट पॉलिशसाठी ७ रुपये आकारणी असतानाही गेल्या दोन वर्षांपासून स्थानकातील बुट पॉलिश कामगारांकडून १० रुपये आकारणी केली जात आहे. १० रुपये आकारणीसाठी मध्य रेल्वेकडून अद्याप कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. तर प्रवाशांनाही याची कल्पना नसून त्यामुळे ही लूट ‘कोणा’च्या जिवावर सुरू आहे, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना त्यांचे बुट चकाचक करून घेण्यासाठी स्थानकातच बुट पॉलिशची व्यवस्था करून देण्यात आली आहे. अनेक प्रवासी स्थानकातच बुट पॉलिश करून घेताना दिसतात. यासाठी मध्य रेल्वेने सर्व स्थानकांत कंत्राटदारांद्वारे बुट पॉलिश कामगार बसविले असून, पॉलिशसाठी एक विशिष्ट दर ठरविले आहेत. सध्याच्या घडीला संपूर्ण मध्य रेल्वे स्थानकांतील मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर १८८ बुट पॉलिश कामगार आहेत. करारानुसार दरवर्षी प्रत्येक कामगारामागे रेल्वेलाही २४१ रुपये लायसन्स फीदेखील मिळते. मात्र रेल्वेकडून प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या या सुविधेतून प्रवाशांचीच लूट केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्ष २0१0च्या आधी क्रीम पॉलिशसाठी ५ रुपये तर साध्या पॉलिशसाठी ४ रुपये आकारण्यात येत होते. २0१0पासून क्रीम पॉलिशमध्ये २ रुपये तर साध्या पॉलिशमध्येही २ रुपये वाढ करण्यात आली. त्यामुळे क्रीम पॉलिशचे दर हे ७ रुपये आणि साध्या पॉलिशचे दर हे ६ रुपये झाले. परंतु स्थानकातील बुट पॉलिशसाठी प्रवासी येताच क्रीम पॉलिश करण्याला प्रवासी प्राधान्य देतात. तर बुट पॉलिश कामगारही प्रवाशांना क्रीम पॉलिश करण्यासाठी गळ घालतात. त्यामुळे प्रवासीही क्रीम पॉलिश करतात. मात्र त्यासाठी १० रुपये आकारणी सर्व स्थानकांतच होत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बुट पॉलिशच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. क्रीम पॉलिशचे दर हे ७ रुपयेच आहेत. परंतु बुट पॉलिश कंत्राटदार व कामगारांकडून १० रुपये आकारणीच केली जाते. ही बाब काही रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याही निदर्शनास आली असल्याचे सांगितले. मात्र याविरोधात कारवाई का केली जात नाही? अशी विचारणा करताच त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. त्यामुळे प्रवाशांची ही सर्रासपणे लूट रेल्वेच्या डोळ्यांदेखत सुरू असल्याचेच दिसते. (प्रतिनिधी)>यासंदर्भात आणखी एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, याबाबत खुद्द रेल्वे कर्मचाऱ्यांनाही याचा अनुभव आला आहे. याची माहिती नक्की घेतली जाईल आणि यात दोषी आढळल्यास कारवाईदेखील करण्यात येईल.