शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

लोककलेच्या जागराने दुमदुमले नाट्यसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 06:08 IST

सलग ६० तास चालणाऱ्या ९८व्या नाट्यसंमेलनाचे फलित काय? असा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकाला आणि रंगकर्मींना संमेलनाआधी पडला होता. मात्र, मुंबई, पुण्याच्या बाहेरही रंगभूमी आहे, याची प्रचिती गुरुवारी पहाटे कालिदास नाट्यमंदिरात उपस्थित असलेल्या प्रत्येक रसिकाला आणि मराठी रंगभूमीवरील प्रत्येक सेलिब्रेटीला आली.

- अजय परचुरेमुंबई : सलग ६० तास चालणाऱ्या ९८व्या नाट्यसंमेलनाचे फलित काय? असा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकाला आणि रंगकर्मींना संमेलनाआधी पडला होता. मात्र, मुंबई, पुण्याच्या बाहेरही रंगभूमी आहे, याची प्रचिती गुरुवारी पहाटे कालिदास नाट्यमंदिरात उपस्थित असलेल्या प्रत्येक रसिकाला आणि मराठी रंगभूमीवरील प्रत्येक सेलिब्रेटीला आली. गुरुवारी मध्यरात्री ‘लोककला जागर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोककलांचा याची देही याची डोळा अनुभव त्यांना घेता आला. उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत या लोककलाकारांना दाद दिली. विदर्भातील झाडेपट्टी रंगभूमी, दंडार, कोकणातला दशावतार, नमन मराठवाड्यातील आदिशक्तीचे पारंपरिक नृत्य, अशा एकापाठोपाठ एक ताकदीच्या लोककला पाहून रसिक अचंबित झाले.अठरापगड जातीच्या महाराष्ट्रात अनेक लोेककला आहेत. ग्रामीण भागातील या लोककला आणि तेथील रंगकर्मींमध्ये जबरदस्त ताकद असते. फक्त त्यांना गरज असते, ती मोठ्या व्यासपीठाची. नाट्यपरिषदेने मुलुंडच्या नाट्यसंमेलनात ही संधी या लोककलावंताना उपलब्धकरून दिली. लोककलेच्या या जागराने मुंबईकरांनाही अवाक करून सोडले. मराठवाड्यातील आदिशक्ती महिशासूर पारंपरिक नृत्याने या लोककला जागर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सलग १५ मिनिटे श्वास रोखून ठेवणारे पारंपरिक नृत्य उस्मानाबादच्या लोककलाकारांनी सादर केले. विशाल शिंगाडे या तरुण रंगकर्मीने या नृत्याचे दिग्दर्शन केले होते.या संमेलनात सर्वात चर्चेचा विषय होता, तो विदर्भातील झाडेपट्टी रंगभूमीचा. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आदी भागांत रात्रभर चालणाºया या झाडेपट्टीच्या नाटकांविषयी मुंबईकरांमध्ये आणि खास करून मराठी कलाकारांमध्ये उत्सुकता होती. मुक्ता बर्वे, समीर विध्वंस, अद्वेत दादरकर, इरावती कर्णिक, समीर चौघुले, मनमीत पेम, अतुल तोडणकर, भारत गणेशपुरे, अनिता दाते, संतोष पवार ही रंगभूमीवरील मंडळी झाडेपट्टीचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. झाडेपट्टी रंगभूमीची नाटके ही सहसा रात्रभर चालतात. चंद्रपूरच्या चंद्रकमल थिएटर्सने फक्त ‘संसार’ अर्थात, ‘भोवरा’ हे शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरील नाटक सादरकेले. कोणताही भव्य सेट नसतानाही, अभिनयाच्या जोरावर झाडेपट्टीच्या कलाकारांनी मुंबईकरांना मंत्रमुग्धकेले. आपल्या कलेला मान्यवर रंगकर्मींचीही भरभरून दाद मिळतेय, हा अनुभवही या लोककलाकारांसाठी मोलाचा होता.कोकणातील दशावतार, नमन यालाही रसिकांनी भरभरून दाद दिली. पहाटे १ वाजता सुरू झालेला ‘लोककला जागर’ हा कार्यक्रम उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांनी आणि वन्स मोअरनी पहाटे ६ पर्यंत अविरत सुरू होता. वाड्या, वस्त्या, लहान गावांमध्ये कमी प्रेक्षकांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण करणाºया या लोककलाकारांना नाट्यपरिषदेने मोठे व्यासपीठ तर मिळवून दिलेच. मात्र, मुंबईकर रसिकांनाही अभिरूची संपन्न असलेल्या या लोककलांचा आस्वाद घेता आला.आमच्यासाठी हे खूप मोठे स्वप्न आहे, असे आम्ही मानतो. इतक्या मोठ्या व्यासपीठावर आम्ही पहिल्यांदाच काम करतोय. आमच्या झाडेपट्टी रंगभूमीच्या कलाकारांना आज एक मोठी संधी मिळाली. मला आनंद या गोष्टींचा वाटला की, रंगभूमीवरील मान्यवर कलाकारांनी आमच्या प्रयोगाला दाद तर दिलीच आणि नंतर प्रत्यक्ष भेटून भरभरून कौतुकही केले. मी नाट्यपरिषदेचा खूप आभारी आहे की, आम्हाला रंगभूमीच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्ही आम्हाला खूप मोलाची मदत केलीत.- शेखर डोंगरे, अभिनेता,दिग्दर्शक, झाडेपट्टी रंगभूमीझाडेपट्टी रंगभूमीबद्दल फक्त ऐकून होतो. रात्रभर चालणाºया नाटकांबाबत मला अभिनेता म्हणून खूप मोठी उत्सुकता होती. कोणताही भव्य सेट नसतानाही या कलाकारांनी केलेला सहजसुंदर अभिनय निश्चित दाद देण्यासारखा आहे. रंगभूमीवर असे प्रयोग सर्रास व्हायला हवेत, असे मला वाटते.- समीर चौघुले, अभिनेता

टॅग्स :98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनmarathiमराठी