शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती

By admin | Updated: August 4, 2016 04:45 IST

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे/मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या महापूरात अडकलेल्या १६ जणांना आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बुधवारी सकाळी पाण्याबाहेर काढले. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पुण्यातही मुठेला पूर आला असून उजनी धरणात पाणीसाठा होऊ लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी, कडवी, कासारी आणि राधानगरी धरणातून विसर्ग होत असल्याने पंचगंगेसह इतर नद्यां धोक्याच्या पातळीवरुन वाहू लागल्या आहे. कृष्णेच्या पातळीत वाढ झाली असून सातारा, सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात महाबळेश्वर येथे तब्बल ४१४ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे़ येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.नाशकात दोघांचा बुडून मृत्यू नाशिक जिल्ह्यात गोदावरीला आलेल्या पूरात आणखी दोघांचा बळी गेला. दोन दिवसांत मृतांची संख्या आठ झाली आहे, तर आणखी तिघा अनोळखी व्यक्तींचे मृतदेह नदीपात्रात सापडल्याने ही संख्या अकरावर पोहोचली. बुधवारी दुपारी चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे दहा वर्षाचा बालक नाल्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाळ विहीर (लोहारवाडी) येथे राहणारे बबन गंगाराम ठाकरे (४०) हे झापामध्ये ठेवलेले सामान आणण्यासाठी गेले असता वाकी खापरी लघुपाटबंधारे खात्याच्या तलावाच्या पाण्याच्या ओढ्यामुळे बुडून मरण पावले, तर तिसगाव येथे चंदू सुकदेव जुमरे हा दहा वर्षाचा मुलगा आईसोबत लेंडी नाल्यात कपडे धुण्यासाठी गेला असता, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. याशिवाय नाशिक येथे दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह गोदावरीच्या पुरात वाहून आले आहेत. बागलाण तालुक्यातील किकवारी येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पुरात सापडला. औरंगाबादमध्ये स्थलांतरपूर परिस्थितीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेकडो लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. एनडीआरएफची एक तुकडी वैजापूरकडे रवाना झाली असून या तुकडीत २५ जवान व तीन बोटींचा समावेश आहे. आतापर्यंत वैजापूर तालुक्यातील १२ गावांमधील ३८६ कुटुंबांमधील २ हजार ८७३, तर गंगापूर तालुक्यातील तीन गावांमधील ७६ कुटुंबांमधील ३४८ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील १३०, हैबतपूर येथील ८, अंमळनेर येथील २१० व्यक्तींचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. १५०० लोकांना हलविलेडोणगावातील दीड हजार तर बाबतारा येथील १२५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाखगंगा येथील रस्ता बंद झाला असून १५० व्यक्तींचे स्थलांतर केले आहे. पूरणगावचीही अशीच परिस्थिती असल्याने तेथील २०० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. चांदेगाव ८, बाजाठाणच्या १२५, नागमठाणच्या १५०, वांजरगावच्या ४५०, नांदूरढोकच्या ३५, सावखेडगंगाच्या ४० आणि बाभूळगावच्या ५० गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे.पुण्यात भिडे पूल पाण्याखालीपुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून तब्बल ४० हजार क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे मुठा नदीने बुधवारी धोक्याची पातळी ओलांडली. सिंहगड रस्त्यावर चार सोसायट्यांमध्ये पाणी घुसले तर दत्तवाडी मधील नदीकाठच्या काही घरांमध्येही पाणी घुसले. बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांचा पाणीसाठा अवघ्या २४ तासात तब्बल साडेचार टीएमसीने वाढला. कोयनेत चार टीएमसीने वाढसातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर अनेक पूल सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली गेल्याने दळवळण ठप्प झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात चोवीस तासांमध्ये ४ टीएमसीने वाढ होऊन ७२.३० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘राधानगरी’चे पाच स्वयंचलित दरवाजे उघडलेकोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घटप्रभा, कुंभी, कडवी, कासारी, राधानगरी या धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून वारणा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.