शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिस्तंभावरून झाडाझडती

By admin | Updated: April 12, 2017 01:21 IST

भीमा कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाला पडलेला अतिक्रमणाचा विळखा हटवण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील

पुणे : भीमा कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाला पडलेला अतिक्रमणाचा विळखा हटवण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची मंगळवारी चांगलीच झाडाझडती घेतली. दरम्यान, काही आमदारांनी संबंधित भागाच्या तलाठ्याचे निलंबन करण्याची मागणी बडोले यांच्याकडे केली.भीमा कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाच्या परिसरातील अतिक्रमण हटवणे तसेच या परिसराचा ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याबाबत बडोले यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड, अ‍ॅड. गौतम चाबूकस्वार, डॉ. बालाजी किणीकर आदी बैठकीस उपस्थित होते.क्रांतिस्तंभाच्या १० एकर जागेवरील अतिक्रमण हटवण्याबाबत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दोन वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याने बडोले यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तसेच मंत्री, आमदार एका मोठ्या समाजाच्या आस्थेच्या विषयावरील बैठक घेत असताना जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही कालावधीत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे हजर झाले. प्रथमत: क्रांतिस्तंभाच्या जागेत अतिक्रमण नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी क्रांतिस्तंभाच्या परिसरात शेती केली जात असल्याने अतिक्रमण झाल्याचे नमूद केले. अधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आल्याने बडोले यांच्यासह उपस्थित आमदारांचा पारा चांगलाच चढला.दोन वर्षांपासून अतिक्रमण हटवावे, यासाठी आम्ही झटत आहोत. मात्र, तुम्ही अतिक्रमण करण्यास परवानगी देता. तुमच्यावर कारवाई का करू नये, असा सवाल बडोले यांनी उपस्थित केला. अतिक्रमण हटवल्यानंतर जागेभोवती सुरक्षा भिंत उभी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सहायक आयुक्तांना दिल्या. यावर येत्या दोन दिवसांत अतिक्रमण हटवण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)क्रांतिस्तंभ परिसराचा ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याबाबत महिन्याभरात मुख्य सचिवांबरोबर बैठक घेतली जाणार आहे.- राजकुमार बडोल, सामाजिक न्याय मंत्री