ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - गेला वीकेण्ड चिंब करणाऱ्या पावसाने यावेळीही तलाव क्षेत्रात रविवारचा मुहूर्त गाठला़ अन् अवघ्या २४ तासांमध्ये ३६ दिवसांचा जलसाठा तलाव क्षेत्रांमध्ये वाढला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत या तारखेला जलसाठ्यात दोन लाख दशलक्ष लीटर्सने वाढ झाली आहे़ म्हणजेच एकूण गरजेच्या ३५ टक्के पाणी तलावांमध्ये जमा झाले आहे़गेल्या वर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात आहे़ त्यातच जून महिना कोरडा गेल्यामुळे यावर्षीही पाणीबाणीची भीती व्यक्त होत होती़ मात्र जुलै महिन्यात तलाव क्षेत्रावर पावसाने कृपादृष्टी दाखविली आहे़ विशेष म्हणजे प्रत्येक वीकेण्डला पर्यटकांप्रमाणे पाऊसही तलाव क्षेत्रामध्ये हजेरी लावू लागला आहे़रविवारी सकाळी ६ पर्यंत मिळालेल्या तलावांमधील पाण्याची स्थितीनुसार ५० ते ६० हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला होता़ तर आज सकाळी मिळालेल्या तलावांच्या पातळीनुसार गेल्या २४ तासांत तलाव क्षेत्रांमध्ये तब्बल एक लाख ३५ हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आहे़ आज दिवसभरही पावसाची हजेरी मुसळधार असल्याने जलसाठा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत़ जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये तलाव कमाल किमान आजची स्थिती आजचा पाऊस(मि़मी़)मोडक सागर १६३़१५ १४३़२६ १५२़४२ ८४़४०तानसा १२८़६३ ११८़८७ १२३़८९ ४०़४०विहार ८०़१२ ७३़९२ ७७़१९ २१़४०तुळशी १३९़१७ १३१़०७ १३८़७८ २०़००अप्पर वैतरणा ६०३़५१ ५९५़४४ ५९७़११ १८२़००भातसा १४२़०७ १०४़९० १२२़२७ २८़००मध्य वैतरणा २८५़०० २२०़०० २५९़६० १०६़९०एकूण २०१६ - ५०३०६९ दशलक्ष लीटर २०१५- २९८२३८ दशलक्ष लीटर* मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ * गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात सुरु असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़* मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़